हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरील सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात मनीष पांडेला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. यंदाच्या हंगामात पहिली संधी मिळताच IPL इतिहासातील पहिला भारतीय शतकवीर असलेल्या बॅटरची एलिट क्लबमध्ये एन्ट्री झाली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मनीष पांडेची एलिट क्लबमध्ये एन्ट्री
मनीष पांडे हा आयपीएल २००८ च्या पहिल्या हंगामापासून जगातील मोठ्या स्पर्धेत खेळताना दिसत आहे. १९ व्या हंगामात कोलकाताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव येताच प्रत्येक हंगामात किमान एक सामना खेळण्याचा खास विक्रम त्याने आपल्या नावे केला. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो तिसरा खेळाडू आहे.
पहिल्या हंगामापासून IPL चा भाग असणारे मोजके खेळाडू
इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या हंगामात रोहित शर्मा, विराट कोहली आणि मनीष पांडे या तिघांशिवाय महेंद्रसिंह धोनी हा देखील CSK च्या ताफ्यात आहे. पण दुखापतीमुळे तो यंदाच्या हंगामात एकही सामना खेळलेला नाही.
आयपीएलच्या १९ हंगामात किमान एक सामना खेळणारे खेळाडू
- विराट कोहली
- रोहित शर्मा
- मनीष पांडे
IPL च्या इतिहासातील पहिला भारतीय शतकवीर
मनीष पांडे हा आयपीएलमध्ये वेगवेगळ्या फ्रँचायझी संघाकडून खेळताना दिसला आहे. २१ मे २००९ रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना त्याने डेक्कन चार्जर्स विरुद्ध शतक झळकावले होते. ७३ चेंडूत नाबाद ११४ धावांच्या खेळीसह तो IPL स्पर्धत शतक झळकवणारा पहिला भारतीय ठरला. IPL च्या पहिल्या हंगामात तो मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. २००९ आणि २०१० च्या हंगामात आरसीबीकडून खेळल्यावर २०११ ते २०१३ पुणे वॉरियर्स, २०१४ ते २०१७ कोलकाता, २०१८ ते २०२१ सनरायझर्स हैदराबाद, २०२२ में लखनौ सुपर जाएंट्स २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळल्यावर २०२४ च्या हंगामापासून तो पुन्हा कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाकडून खेळताना दिसत आहे.
Web Summary : Manish Pandey, receiving his first chance this season with KKR, entered an elite club alongside Rohit Sharma and Virat Kohli. He achieved the feat of playing at least one match in every IPL season since 2008. Pandey was also the first Indian to score an IPL century.
Web Summary : मनीष पांडे को केकेआर के साथ इस सीजन में पहला मौका मिला, जिसके बाद उन्होंने रोहित शर्मा और विराट कोहली के साथ एक एलीट क्लब में प्रवेश किया। उन्होंने 2008 से हर आईपीएल सीजन में कम से कम एक मैच खेलने का कारनामा हासिल किया। पांडे आईपीएल शतक बनाने वाले पहले भारतीय भी थे।