इराणवर अमेरिकेने लादलेले निर्बंध आणि समुद्रातील कडक पाळत असूनही, इराणचे एक महाकाय तेल टँकर अमेरिकन नौदलाला चकवून दक्षिण-पूर्व आशियात पोहोचले आहे. या टँकरमध्ये तब्बल १९ लाख बॅरल कच्चे तेल असल्याची माहिती समोर आली आहे.
जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत इराणने पुन्हा एकदा आपल्या तेल व्यापाराचा मार्ग मोकळा केल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेच्या नौदलाची नजर चुकवून इराणचे 'HUGE' (IMO: 9357183) नावाचे सुपरटँकर दक्षिण-पूर्व आशियाई देशांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. तब्बल २२० दशलक्ष डॉलर (सुमारे १,८०० कोटी रुपये) किमतीचे कच्चे तेल घेऊन निघालेल्या या जहाजाने अमेरिकेच्या कडक पाळतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
'डार्क ॲक्टिव्हिटी'ने अमेरिकेला गुंगारा
समुद्री जहाजांच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या 'टँकर ट्रॅकर्स' या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या जहाजाने २० मार्चपासून आपली 'ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टम' म्हणजेच ट्रॅकिंग यंत्रणा बंद केली होती. समुद्रामध्ये जेव्हा एखादे जहाज निर्बंध टाळण्यासाठी आपली ओळख लपवून प्रवास करते, तेव्हा त्याला तांत्रिक भाषेत 'डार्क ॲक्टिव्हिटी' म्हटले जाते. श्रीलंकेजवळ शेवटचे दिसलेले हे जहाज आता इंडोनेशियाच्या 'लोम्बोक स्ट्रेट'मधून प्रवास करत रियाऊ बेटांच्या दिशेने सरकत आहे.
मलक्काची सामुद्रधुनी ओलांडून प्रवास
जगातील सर्वात गजबजलेला सागरी मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'स्ट्रेट ऑफ मलक्का'मधून या टँकरने प्रवास केला. अमेरिकेने १३ एप्रिलपासून इराणची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी समुद्रात कडक मोहीम राबवली आहे. या कारवाईमुळे इराणचे आतापर्यंत ४.८ अब्ज डॉलर (सुमारे ४५ हजार कोटी रुपये) इतके नुकसान झाले आहे. मात्र, इतक्या मोठ्या नुकसानीनंतरही इराणने हे सुपरटँकर सुरक्षितपणे आशियाई बाजारपेठेत पोहोचवण्यात यश मिळवले आहे.
काय होणार परिणाम?
इराणच्या या सुपरटँकरने नाकेबंदी तोडल्यामुळे अमेरिकेच्या सागरी लष्करी क्षमतेवर आणि गुप्तचर यंत्रणांवर टीका होऊ लागली आहे. व्यस्त सागरी मार्गांवर प्रत्येक जहाजावर बारीक लक्ष ठेवणे किती आव्हानात्मक आहे, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. अद्याप यावर अमेरिकेकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र यामुळे येणाऱ्या काळात समुद्रात पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Web Summary : Despite US sanctions, Iran successfully delivered 1.9 million barrels of crude oil to Southeast Asia by disabling tracking systems. The supertanker 'HUGE' navigated through busy sea lanes, evading American naval surveillance, raising questions about maritime security and potential tensions.
Web Summary : अमेरिकी प्रतिबंधों के बावजूद, ईरान ने ट्रैकिंग सिस्टम बंद करके दक्षिण पूर्व एशिया में 1.9 मिलियन बैरल कच्चा तेल सफलतापूर्वक पहुंचाया। सुपरटैंकर 'HUGE' व्यस्त समुद्री मार्गों से होते हुए अमेरिकी नौसेना की निगरानी से बच निकला, जिससे समुद्री सुरक्षा और संभावित तनावों पर सवाल उठ रहे हैं।