शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
5
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
6
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
7
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
8
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
9
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
10
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
11
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
12
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
13
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
14
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
15
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
16
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
17
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
18
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
19
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
20
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
Daily Top 2Weekly Top 5

Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 16:57 IST

truck crashed into road landslide viral video: थरकाप उडवणारा व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर तुफान व्हायरल

truck crashed into road landslide viral video: सोशल मीडियावर कायम विविध गोष्टी व्हायरल होत असतात. कधी एखादं गाणं व्हायरल होतं, तर एखादा व्हिडीओ चर्चेत येतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मनाली-लेह राष्ट्रीय महामार्गावर नुकताच एक अपघात घडला. एक अवजड ट्रक रस्त्यावरून जात होता. सर्व काही सामान्य वाटत होते, पण अचानक रस्त्याचा एक भाग खचला. ट्रकचा मागचा भाग जमिनीत रुतू लागला. ते दृश्य इतके भयावह होते की, तिथे उपस्थित असलेले लोक घाबरून गेले.

नेमकी काय घडली घटना?

एक ट्रक डोंगराळ भागात मार्गावरून जात असताना एका विशिष्ट ठिकाणी रस्त्याचा भाग अचानक खचला. ट्रकचा मागील भाग या खड्ड्यात अडकला आणि ट्रक एका बाजूला धोकादायक पद्धतीने झुकला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मागच्या कारच्या चालकाने तातडीने कार मागे घेतली आणि योग्य नियंत्रण राखले. जर ट्रकचा वेग जास्त असता किंवा कारचालकाचे प्रसंगावधान नसते तर ट्रक थेट दरीत कोसळण्याची शक्यता होती. पाहा व्हिडीओ-

ट्रकच्या ड्रायव्हरने मारली उडी, वाचला जीव

ट्रक खचलेल्या रोडमध्ये अडकल्यावर अखेर ड्रायव्हरने जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याने अडकलेल्या ट्रकचा दरवाजा उघडून थेट रस्त्यावर उडी मारली. त्यानंतर हा ट्रक काढण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले. आधी बर्फ बाजूला काढण्यात आला. त्यानंतर अखेर क्रेन व जेसीबीच्या मदतीने ट्रक रस्त्याच्या खड्ड्यातून बाहेर काढला गेला.

दरम्यान, या घटनेमुळे काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. हिमालयीन पट्ट्यात डोंगराचे भाग ठिसूळ होणे आणि रस्ते खचण्याचे प्रकार वाढले आहेत. या घटनेनंतर रस्ते सुरक्षा आणि देखभालीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सीमा रस्ते संघटनेने (BRO) तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन ट्रक बाहेर काढण्याचे आणि रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले.

मनाली-लेह महामार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना आणि चालकांना प्रशासनातर्फे अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Truck crashes as road collapses on Manali-Leh highway: Driver escapes.

Web Summary : A truck partially sank after a road collapsed on the Manali-Leh highway. The driver jumped to safety as the vehicle tilted precariously. Recovery required a crane and JCB. The incident caused traffic jams, raising concerns about road safety in the Himalayas.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडिया