शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 18:41 IST

प्रेमविवाहाच्या अडीच महिन्यानंतर शालिनी नावाच्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. हुंड्यासाठी सासरच्यांनी तिची हत्या केल्याचा आरोप भावाने केला आहे.

उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये प्रेमविवाहाच्या अवघ्या अडीच महिन्यांतच एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. 'सासरकडचे मला माहेरी जाऊ देत नाहीत, माझ्या जीवाला धोका आहे,' अशी आर्त हाक शालिनीने फोनवरून भावाला दिली होती. मात्र, भाऊ मदतीला पोहोचण्यापूर्वीच तिचा करुण अंत झाला.

प्रेमाचा गोड प्रवास लग्नानंतर अवघ्या ७५ दिवसांत रक्ताने माखला जाईल, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. बरेलीच्या सुभाषनगर परिसरात राहणाऱ्या शालिनीने आपल्या आवडीच्या मुलाशी लग्न केलं, पण लग्नानंतर काही दिवसांतच तिचं स्वप्न नरकात बदललं. शनिवारी शालिनीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत तिच्या सासरी आढळला. याप्रकरणी माहेरच्या लोकांनी सासरच्यांविरोधात हुंड्यासाठी खून केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

१९ फेब्रुवारीला थाटला होता संसार

बिहारीपूर वाल्मीकी मंदिर परिसरात राहणाऱ्या शालूने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याची बहीण शालिनीने १९ फेब्रुवारी रोजी अक्षय नावाच्या तरुणाशी प्रेमविवाह केला होता. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होतं, मात्र लग्नानंतर काही दिवसांतच अक्षय आणि त्याच्या कुटुंबीयांनी शालिनीला हुंड्यासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. "हुंड्यात कार घेऊन ये," असा तगादा सासरच्यांनी लावला होता. त्यासाठी शालिनीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता.

तो शेवटचा फोन आणि जीवाचा धोका

२ मे रोजी सकाळी ८ च्या सुमारास शालिनीने रडत रडत आपल्या भावाला फोन केला. ती अत्यंत घाबरलेली होती. "मला हे लोक माहेरी येऊ देत नाहीत, मला इथे डांबून ठेवलं आहे. माझ्या जीवाला धोका आहे, मला वाचवा," अशी विनवणी तिने भावाकडे केली. या फोननंतर काही वेळातच अक्षयने शालूला फोन करून सांगितले की, "शालिनीची तब्येत ठीक नाहीये, ती काहीच बोलत नाहीये." शालू धावतच बहिणीच्या घरी पोहोचला, तेव्हा तिथे शालिनीचा मृतदेह पडलेला होता.

हुंडाबळीचा गुन्हा दाखल; ४ जणांविरुद्ध कारवाई

याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत शालिनीचा पती अक्षय, सासू गीता, आकाश आणि अमन यांच्यासह इतर अज्ञात लोकांविरुद्ध 'हुंडाबळी' आणि हत्येच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. "आम्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पीएम रिपोर्ट आल्यावर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. आरोपींची चौकशी सुरू आहे," अशी माहिती इन्स्पेक्टर सतीश कुमार नैन यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Love marriage turns tragic: Woman's plea unheard, dies in Bareilly.

Web Summary : Bareilly: Just months after her love marriage, Shalini died suspiciously. She feared for her life due to dowry harassment. Police are investigating a dowry death case against her husband and in-laws after her family alleged murder.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश