IPL 2026, KKR Seven Wicket Win Over SRH : कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने घरच्या मैदानात खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादचा ७ विकेट्सनी धुव्वा उडवत सलग तिसऱ्या विजयासह प्लेऑफ्सच्या आशा कायम ठेवल्या आहेत. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेनसह जलदगती गोलंदाज कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीसमोर पहिल्यांदा फलंदाजी करताना तगडी फलंदाजी असलेला सनरायझर्स हैदराबादचा संघ १६५ धावांत गारद झाला. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईकर अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशीच्या हिट शोनंतर रिंकूच्या फिनिशिंग टचसह कोलकाता नाईट रायडर्सने विजय निश्चित केला.
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर अभिषेक शर्मा आणि ट्रॅविस हेड जोडीनं संघाला दमदार सुरुवात करून दिली. पण संघाच्या धावफलकावर ४४ धावा असताना चौथ्या षटकात कार्तिक त्यागीनं अभिषेक शर्माच्या खेळीला १५ धावांवरच ब्रेक लावला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या ईशान किशन याने ट्रॅविस हेडसोबत दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला मजबूत स्थितीत नेले. ट्रॅविस हेड २८ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६१ धावांची खेळी करून वरुण चक्रवर्तीच्या जाळ्यात फसला. सुनील नरेन याने ईशान किशनला ४२ धावांवर तंबूतचा रस्ता दाखवला. त्यानंतर SRH च्या एकाही बॅटरला मैदानात तग धरता आला नाही. परिणामी सनरायझर्स हैदराबादचा संघ १९ षटकात १६५ धावांवर आटोपला. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाकडून वरुण चक्रवर्तीनं सर्वाधिक ३ तर सुनील नरेन आणि कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. याशिवाय अनुकूल रॉय, वैभव अरोरा आणि कॅमरून ग्रीन यानी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
Web Summary : Kolkata Knight Riders defeated Sunrisers Hyderabad by 7 wickets, securing their third consecutive win. Varun Chakravarthy and Sunil Narine restricted SRH to 165. Rahane and Raghuvanshi's partnership, followed by Rinku Singh's finish, ensured KKR's victory and kept their playoff hopes alive.
Web Summary : कोलकाता नाइट राइडर्स ने सनराइजर्स हैदराबाद को 7 विकेट से हराया, लगातार तीसरी जीत दर्ज की। चक्रवर्ती और नरेन ने SRH को 165 पर रोका। रहाणे और रघुवंशी की साझेदारी और रिंकू सिंह के फिनिश ने KKR की जीत सुनिश्चित की।