Sunil Narine 200 Wickets In IPL : कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार फिरकीपटू सुनील नरेन याने आयपीएलमध्ये नवा इतिहास रचला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने सलिल अरोराला बाद करत आयपीएलमध्ये २०० विकेट्सचा पल्ला गाठला. नरेन हा IPL इतिहासात २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज ठरला आहे. एकंदरीत विचार करता IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा तो युझवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार यांच्यानंतर तिसरा गोलंदाज आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
IPL मध्ये चहलन सर्वात आधी गाठला होता हा पल्ला
IPL च्या इतिहासात सर्वात आधी २०० विकेट्सचा डाव साधण्याचा पराक्रम हा भारतीय लेगस्पिनर युझवेंद्र चहलने केला होता. याच हंगामात आरसीबीच्या ताफ्यातून सर्वोत्तम कामगिरी करत असलेल्या भुवनेश्वर कुमारनं २०० विकेट्सचा टप्पा गाठला. आता या यादीत कोलकाता नाईट रायडर्सचा मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा समावेश झाला आहे.
सुनील नरेनची ऐतिहासिक कामगिरी
मागील १४ वर्षांपासून सुनील नरेन कोलकाता नाईट रायडर्सचा प्रमुख खेळाडू आहे. या फ्रँचायझीला ३ वेळा विजेतेपद मिळवून देण्यात त्याची मोठी भूमिका राहिली आहे. IPL मध्ये एका संघाकडून खेळताना २०० विकेट्स घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. वेस्ट इंडिजच्या या दिग्गज फिरकीपटूने २०१२ मध्ये KKR कडून पदार्पण केलं आणि तेव्हापासून तो याच संघाचा अविभाज्य भाग आहे.
IPL मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
- २२८ - युझवेंद्र चहल
- २१५ - भुवनेश्वर कुमार
- २०१ - सुनील नरेन
- १९२ - पीयूष चावला
- १८७- रविचंद्रन अश्विन
- १८६ - जसप्रीत बुमराह
- १८३ – ड्वेन ब्रावो
Web Summary : Sunil Narine made IPL history, becoming the first foreign bowler to claim 200 wickets. He's the third overall after Chahal and Kumar. Narine, a KKR mainstay for 14 years, played a key role in their title wins and is the first to achieve this milestone for one team.
Web Summary : सुनील नरेन ने आईपीएल में इतिहास रचा, 200 विकेट लेने वाले पहले विदेशी गेंदबाज बने। वह चहल और कुमार के बाद तीसरे खिलाड़ी हैं। नरेन 14 वर्षों से केकेआर के मुख्य आधार रहे हैं, उन्होंने टीम की जीत में महत्वपूर्ण भूमिका निभाई है और एक टीम के लिए यह उपलब्धि हासिल करने वाले पहले खिलाड़ी हैं।