1 / 10आपण अनेक वेळा विज्ञानाचे चमत्तकार बघितले असतील, ऐकले असतील अथवा वाचले असतील. पण, एकाच आईच्या गर्भातून, एकाच वेळी जन्माला आलेल्या दोन जुळ्या मुलांचे वडील वेगवेगळे असू शकतात, यावर आपला विश्वास बसेल का? कदाचित नाही. मात्र, ब्रिटनमध्ये असाच चमत्कार समोर आला आहे. खरे तर असा प्रकार अगदी क्वचितच घडतो. जागतिक वैद्यकीय इतिहासात आतापर्यंत अशा अगदी २० पेक्षाही कमी प्रकरणांची नोंद आहे.2 / 10खरेतर, या दोन ४९ वर्षीय जुळ्या बहिणींनी जेव्हा आपापली डीएनए चाचणी केली, तेव्हा हे गुपित उघड झाले आणि त्यांना धक्काच बसला. या दोघीही प्रत्यक्षात 'हाफ-सिस्टर्स' असून त्यांचे जैविक अथवा बायोलॉजिकल वडील वेगवेगळे असल्याचे समोर आले. महत्वाचे म्हणजे, वैद्यकीय विज्ञान विश्वातील ही एक अत्यंत दुर्मिळ आणि चमत्कारिक घटना मानली जात आहे. (AI Image)3 / 10दोन्ही बहिणींना आधीपासूनच होती शंका - ४९ वर्षीय मिशेल आणि लवीनिया ऑस्बॉर्न या जुळ्या बहिणींना आधीपासूनच आपल्या वडिलांसंदर्भात शंका होती. मिशेल यांना नेहमीच वाटायचे की, आपला चेहरा आपले वडिल जेम्स यांच्या चेहऱ्याशी अजिबात जुळत नाही. ही शंका दूर करण्यासाठी त्यांनी डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला 4 / 10मिशेल यांनी घरबसल्याच डीएनए किट मागवून चाचणी केली. तर अहवालात जेम्स त्यांचे वडील नसल्याचे समोर आले. यानंतर लवीनियानेही चाचणी केली, तर त्यांच्या अहवालातूनही मोठे रहस्य उघड झाले. या दोघींचेही वडील दोन वेगळ्या व्यक्ती असल्याचे आढळून आले.5 / 10कसा घडतो अशा प्रकारचा दुर्मिळ चमत्कार? - या चमत्काराला विज्ञानाच्या भाषेत 'हेटेरोपॅटर्नल सुपरफेकंडेशन' (Heteropaternal Superfecundation) असे म्हटले जाते. जेव्हा एकाच मासिक पाळीदरम्यान महिलेच्या शरीरातून दोन अंडी रिलीज होतात आणि ती दोन्ही अंडी अत्यंत कमी कालावधीत दोन वेगवेगळ्या पुरुषांच्या शुक्राणूने फर्टिलाइझ होतात, तेव्हा अशी स्थिती निर्माण होते. 6 / 10परिणामी वेगवेगळ्या वडिलांच्या जुळ्या मुलांचा जन्म होतो. जागतिक वैद्यकीय इतिहासाचा विचार करता, आतापर्यंत अशा २० पेक्षाही कमी घटनांची नोंद झाली आहे. तसेच, ब्रिटनचा विचार करता, कायदेशीर आणि वैज्ञानिकदृष्ट्या नोंदवले गेलेले हे पहिलेच प्रकरण आहे.7 / 10आईनं आयुष्यभर जपलं गुपित, पण... - महत्वाचे म्हणजे, या दोन्ही मुलींच्या आईने आपल्या संबंधांचे गुपित आयुष्यभर जपले. मात्र, दुर्दैवाने २०२२ मध्ये जेव्हा या चाचण्यांचे निकाल समोर आले, त्याच काळात त्यांच्या आईचे निधन झाले. (AI Image)8 / 10बीबीसी रेडिओ 4 वरील सीरीज 'द गिफ्ट' नावाच्या एका कार्यक्रमात या दोन्ही बहिणींनी आपला अनुभव सांगितला. या बहिणींनी सांगितले की, त्यांनी आता त्यांच्या खऱ्या वडिलांचा शोध घेतला आहे. मिशेलचे वडील एलेक्स हे तिच्या मामाचे मित्र होते, तर लवीनियाचे वडील आर्थर आहेत. (AI Image)9 / 10अनेक वर्षांनंतर, आपल्या खऱ्या वडिलांना भेटून या दोन्ही बहिणी अत्यंत आनंदी आहेत. विशेष म्हणजे, 'डीएनए'मध्ये त्यांचे वडील वेगळे निघाले असले, तरी त्यांच्यातील प्रेम आणि बहिणीचे नाते आजही पूर्वीप्रमाणेच घट्ट आहे. (AI Image)10 / 10अनेक वर्षांनंतर, आपल्या खऱ्या वडिलांना भेटून या दोन्ही बहिणी अत्यंत आनंदी आहेत. विशेष म्हणजे, 'डीएनए'मध्ये त्यांचे वडील वेगळे निघाले असले, तरी त्यांच्यातील प्रेम आणि बहिणीचे नाते आजही पूर्वीप्रमाणेच घट्ट आहे. (AI Image)