शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 23:18 IST

आतापर्यंत चार ते पाच दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली असून नुकसानीचा आकडा कोट्यवधींच्या घरात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून आगीच्या विळख्यात अडकणाऱ्या परतवाडा येथील लाकूड बाजारात रविवारी रात्री पुन्हा एकदा भीषण आग लागली. या आगीने पाहता पाहता रौद्र रूप धारण केल्याने लाकूड आणि फर्निचर व्यापाऱ्यांची एकच पळापळ झाली. आतापर्यंत चार ते पाच दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली असून नुकसानीचा आकडा कोट्यवधींच्या घरात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.रविवारी ​रात्री ९ वाजेच्या सुमारास लागलेली ही आग वाऱ्याच्या वेगामुळे क्षणात पसरली. विशेष म्हणजे, हाकेच्या अंतरावर असलेल्या अचलपूर नगर परिषदेची अग्निशमन गाडी तब्बल अर्धा तास उशिराने पोहोचल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. सध्या नगर परिषदेचा एकमेव बंब आग विझवण्यासाठी 'केविलवाणा' प्रयत्न करत आहे. चांदूर बाजार, अंजनगाव, अमरावती आणि मोर्शी येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असले तरी, उशिरापर्यंत त्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या नव्हत्या.​सुरक्षेच्या कारणास्तव परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात काळोख पसरला असून, नागरिक मोबाईलच्या टॉर्च आणि एका हॉटेलवरून तात्पुरत्या घेतलेल्या फोकसच्या प्रकाशात आग विझवण्याचा आणि दुकानातील माल वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अचलपूर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे रोखण्यात आली असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.​या लाकूड बाजाराला आतापर्यंत पाचव्यांदा मोठी आग लागली आहे. दरवेळी लाखो-कोट्यवधींचे नुकसान होते, शेजारील रहिवासी वस्तीचा जीव टांगणीला लागतो, मात्र प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.

टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दल