Join us
Daily Top 2Weekly Top 5

GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी

पंजाबच्या मदतीला धावला मुंबईकर

By सुशांत जाधव | Updated: May 3, 2026 22:38 IST

Open in App

Mumbai Star Suryansh Shedge Rescues Punjab Kings With Maiden IPL Fifty : गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील ४६ वा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या पंजाब किंग्सची अवस्था अतिशय बिकट झाली होती.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पंजाबच्या मदतीला धावला मुंबईकर

गुजरातच्या ताफ्यातील  मोहम्मद सिराजनं पहिल्याच षटकात दोन चेंडूवर दोन विकेट्स घेतल्या. मग जेसन होल्डर आणि कगिसो रबाडा ही जोडी पिक्चरमध्ये आली. पंजाबचा अर्धा संघ ४७ धावांवर तंबूत परतला असताना मुंबईकर सूर्यांश शेडगे पंजाब किंग्ससाठी संकटमोचक झाला. त्याने २४ चेंडूत IPL पहिले अर्धशतक साजरे केले. त्याच्या या अर्धशतकाच्या जोरावर पंजाब किंग्सच्या संघाला ९ बाद १६३ धावांपर्यंत मजल मारता आली.

GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!सूर्यांश शेडगेचं पहिलं IPL अर्धशतक

सूर्यांश शेडगे याने आपल्या IPL कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्याने २९ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. त्याची ही खेळी ३ चौकार आणि ५ षटकारांसह बहरलेली होती. कगिसो रबाडाने त्याला बाद केलं. त्याआधी त्याने पंजाबच्या संघाचा डाव सावरला होता. 

  एका षटकात कुटल्या २७ धावा

गुजरात टायटन्सकडून १४ वे षटक घेऊन आलेल्या मानव सुथारच्या गोलंदाजीवर सूर्यांश शेडगेनं आक्रमक फटकेबाजीचा खास नजराणा पेश केला. मार्कस स्टॉयनिसने पहिल्या चेंडूवर एक धाव घेतल्यावर सूर्यांश शेडगे स्ट्राइकवर आला. दोन चेंडूंवर सलग दोन षटकार मारल्यावर पुढच्या दोन चेंडूवर सूर्यांशनं दोन खणखणीत चौकार मारले. हे षटक त्याने षटकारासह संपवत एका षटकात २७ धावा कुटल्या. 

मानव सुथारच्या नावे लाजिरवाणा विक्रम

या षटकासह मानव सुथार गुजरात टायटन्सच्या संघाकडून सर्वात महागडे षटक टाकणारा दुसरा फिरकीपटू ठरला. या यादीत राशिद खान अव्वलस्थानी आहे.  २०२४ च्या हंगामात अहमदाबादच्या मैदानातच या स्टार फिरकीपटूने २९ धावा खर्च केल्या होत्या. 

कोण आहे सूर्यांश शेडगे?

सूर्यांश शेडगे हा मुंबईचा युवा अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. उजव्या हाताने मोठे फटकेबाजी करण्याची क्षमता असलेला फलंदाज  मध्यमगती गोलंदाजीही करतो. व्हाईट-बॉल क्रिकेटमधील फिनिशिंग क्षमतेसाठी तो विशेष ओळखला जातो. मुंबईकराने स्पर्धात्मक क्रिकेट स्पर्धेत पॉवर-हिटिंग आणि मधल्या फळीत संयमी खेळीमुळे लक्ष वेधून घेतलं आहे. देशांतर्गत टी-२० स्पर्धांमधील दमदार कामगिरीमुळे सूर्यांश शेडगे चर्चेत आला. डावाच्या अखेरीस वेगाने धावा करण्याची क्षमता आणि गोलंदाजीत उपयुक्त षटके टाकण्याची गुणवत्ता यामुळे त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसारख्या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व केलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Suryansh Shedge's Fifty Rescues Punjab After Top Order Collapse Against Gujarat

Web Summary : Mumbai's Suryansh Shedge hit a maiden IPL fifty (57 off 29) rescuing Punjab from 47/5 against Gujarat. His aggressive hitting, including 5 sixes and 3 fours, helped PBKS reach 163/9 after a disastrous start.
टॅग्स :आयपीएल २०२६गुजरात टायटन्सपंजाब किंग्स