Who Is Nishant Sindhu Makes His IPL Debut For Gujarat Titans : आयपीएल २०२६ स्पर्धेतील यंदाच्या हंगामात शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सच्या संघाने प्रिती झिंटाच्या सह मालकीच्या पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात शाहरुख खानच्या जागी बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी दिली. IPL पदार्पणाआधी वर्ल्ड चॅम्पियनच्या टॅगसह मिरवणारा निशांत सिंधू याने CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून दिवस काढले आहेत. एवढेच नव्हे तर तो या संघाकडून IPL चॅम्पियनही ठरला आहे. इथं जाणून घेऊयात बॉक्सरच्या लेकाचा क्रिकेटर होण्याच्या प्रवासाची खास स्टोरी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
२०११ चा वर्ल्ड कपमधून प्रेरणा! बॉक्सरच्या लेकानं क्रिकेटर व्हायचं ठरवलं
हरियाणातील रोहतक येथील निशांत सिंधू याचे वडील राज्यस्तरावरील बॉक्सर राहिले आहेत. सिंधू हा डावखुऱ्या हाताचा फलंदाज आणि फिरकी गोलंदाजीसाठी ओळखला जातो. २०११ मध्ये भारतीय पुरुष संघाने वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली. ही गोष्ट बॉक्सरच्या लेकासाठी प्रेरणादायी ठरली. क्रिकेटर होण्याचं स्वप्न उराशी बाळगत तो त्यासाठी मेहनत घेऊ लागला.
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
देशांतर्गत स्पर्धा गाजवल्यावर अंडर १९ वर्ल्ड कपसाठी निवड
२०१८-१९ च्या देशांतर्गत हंगामात निशांतने विजय मर्चंट चषक स्पर्धेत आपल्या खास कामगिरीनं लक्षवेधून घेतले होते. या स्पर्धेत त्याने हरियाणाकडून ५७२ धावासंह २३ विकेट्स घेतल्या. याच कामगिरीच्या जोरावर त्याने २०२२ च्या अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात एन्ट्री झाली. या स्पर्धेत त्याने १४० धावा आणि ६ विकेट्स घेत भारतीय संघाला वर्ल्ड चॅम्पियन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
CSK नं ६० लाखांची बोली लावली, पण...
अंडर १९ वर्ल्ड चॅम्पियनचा टॅग लावल्यावर चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने २०२३ च्या हंगामाआधी मूळ किंमत २० लाख रुपये असलेल्या निशांत सिंधूसाठी ६० लाख रुपये मोजत आपल्या संघात घेतले. २०२३ मध्ये CSK च्या संघाने IPL चे पाचवे जेतेपद पटकावले. त्यावेळी निशांत या संघाचा भाग होता. पण त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. २०२५ आधी चेन्नईच्या संघाने त्याला रिलीज केले. गुजरात टायटन्सच्या संघाने ३० लाखांसह त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.