"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 19:40 IST2026-05-03T19:39:10+5:302026-05-03T19:40:25+5:30

पश्चिम बंगाल निवडणूक निकालांपूर्वीच उत्तर प्रदेशातील एका मौलानाचे भडकावू विधान केले आहे. याचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. महत्वाचे, या व्हिडिओमध्ये संबंधित मौलानाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 'शेर' म्हणून संबोधले आहे.

Its time to cry Maulana Jargish Ansari's provocative statement even before the Bengal results; He called Yogi a lion | "रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!

"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी येणार आहे. बंगालमधून ममता बॅनर्जींचे सरकार जाणार आणि भाजपचे सरकार येणार असा अंदाज बहुतांश एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. मात्र चित्र ४ मे रोजी स्पष्ट होईलच. मात्र, या निकालांपूर्वीच उत्तर प्रदेशातील एका मौलानाचे भडकावू विधान केले आहे. याचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. महत्वाचे, या व्हिडिओमध्ये संबंधित मौलानाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 'शेर' म्हणून संबोधले आहे.

उत्तर प्रदेशातील इटावा येथील मौलाना जर्जिश अंसारी (Maulana Jarjis Ansari) यांनी बंगालमधील मतमोजणीपूर्वी समाजाला संबोधित (तकरीर) करताना, बंगालच्या जनतेला उद्देशून ते म्हणाले, "बंगालच्या जनतेचे अभिनंदन. तुम्हाला जे हवे होते, तेच मिळाले आहे. निवडणुकीतील बंगालच्या जनतेच्या चुकांचे परिणाम मुस्लिमांना भोगावे लागतील. आता रडण्याची वेळ आली आहे, फार चांगली वेळ नाहीये. चला कधीतरी येऊ, तेव्हा कळेल की आज अमुक-अमुक ठिकाणी सभा घेणे शक्य होणार नाही, कारण एसपी साहेबांनी सभा नाकारली आहे. आता मशिदींवरील लाउडस्पीकर बंद होतील."

...नाव घेतले तर तुरुंगात जाईन -
मौलाना अंसारी यांनी पुढे, उत्तर प्रदेश आणि बिहारचा उल्लेख करत, बंगालमधील मुस्लिमांना काही काळ 'कोल्हा' (शांत) बनण्याचा सल्ला दिला. तसेच नाव न घेता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा उल्लेख 'शेर' असा केला. ते म्हणाले,  "मी सिंहाचे (शेर) नाव घेतले तर तुरुंगात जाईन." 

मौलाना जर्जिश अंसारी हे त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी यापूर्वीही चर्चेत राहिले आहेत. याआधी त्यांनी उत्तर प्रदेशातील मुस्लिमांना बंगालमध्ये स्थलांतरित होण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, आम्ही संंबंधित व्हायरल व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.

 

Web Title : बंगाल चुनाव नतीजों से पहले मौलाना का विवादित बयान; योगी को बताया 'शेर'

Web Summary : बंगाल चुनाव नतीजों से पहले, मौलाना जरजिस अंसारी ने भड़काऊ बयान दिया, जिसमें मुसलमानों के लिए गंभीर परिणाम की भविष्यवाणी की गई। उन्होंने उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ की प्रशंसा करते हुए उन्हें 'शेर' बताया और मुसलमानों को चुप रहने की सलाह दी, संभावित प्रतिबंधों का संकेत दिया।

Web Title : Controversial statement by Maulana before Bengal election results; calls Yogi 'Lion'.

Web Summary : Ahead of Bengal's election results, Maulana Jarjis Ansari issued a provocative statement, predicting dire consequences for Muslims. He praised Uttar Pradesh CM Yogi Adityanath, referring to him as a 'lion,' while advising Muslims to remain silent, hinting at potential restrictions.