लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 18:56 IST2026-05-03T18:46:00+5:302026-05-03T18:56:34+5:30

ओळख उघड करण्यामागचं कारण काय?

Vinesh Phogats Big Revelation I Am Among The 6 Victims Who Complained Against Brij Bhushan Expresses Security Concerns Over Gonda Trials | लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"

लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"

Vinesh Phogats Big Revelation Who Complained Against Brij Bhushan Singh: ऑलिम्पियन महिला कुस्तीपटू आणि काँग्रेस आमदार विनेश फोगाट आणि बृजभूषण शरण सिंह यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विनेशने गंभीर आरोप करत सांगितलं आहे की, भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी लैंगिक शोषण केलेल्या सहा पीडित महिला कुस्तीपटूंपैकी मी देखील एक आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

आता मला बोलणं भाग आहे, नेमकं काय म्हणाली विनश फोगाट?

जंतर-मंतरवरील महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा प्रमुख चेहरा राहिलेल्या विनेश फोगाटने रविवारी ३ मे रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत स्वतःची ओळख उघड केली आहे. विनेशने सांगितलं की, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे आणि स्वतःच्या सन्मानासाठी आतापर्यंत ही बाब लपवून ठेवली होती, पण सध्याच्या परिस्थितीमुळे मला हे बोलणं भाग पडलं आहे.

Wrestlers Stage Protest: ब्रिजभूषण सिंह महिला खेळाडूंचा लैंगिक छळ करतो; विनेश फोगाटच्या आरोपाने क्रीडा क्षे...

ओळख उघड करण्यामागचं कारण काय?

विनेशने जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यात तिने म्हटलं आहे की, हे प्रकरण अद्याप न्यायालयात असून साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात असल्यामुळे आतापर्यंत मी या प्रकरणावर मौन बाळगून होते. मात्र भारतीय कुस्ती महासंघाने उत्तर प्रदेशातील गोंडा येथे रँकिंग स्पर्धा आणि ट्रायल्स आयोजित करण्याचा निर्णय घेतल्याने आता आवाज उठवावा लागत आहे.

...तर सरकार जबाबदार असेल

गोंडा हे बृजभूषण शरण सिंह यांचा बालेकिल्ला आहे आणि त्यांच्या खासगी महाविद्यालयात ट्रायल्स घेणं निष्पक्ष खेळाच्या भावनेविरोधात आहे. विनेश फोगाटने या व्हिडिओद्वारे भारत सरकारलाही थेट लक्ष्य केलं आहे. तिने गंभीर चिंता व्यक्त करत म्हटलं की, जर नॅशनल ओपन रँकिंग स्पर्धेदरम्यान मला, माझ्या टीमला किंवा माझ्या समर्थकांना काहीही झालं, तर त्याची जबाबदारी केंद्र सरकारची असेल. स्पर्धेदरम्यान पारदर्शकता राखण्यासाठी  माध्यमे आणि क्रीडा समुदायाने स्पर्धास्थळी उपस्थित राहावे, असे आवाहनही तिने केले आहे.

निष्पक्ष स्पर्धेबाबत विनेशला शंका

३१ वर्षीय कुस्तीपटूने भीती व्यक्त करत सांगितलं की, गोंडा सारख्या ठिकाणी, जिथे बृजभूषण यांचा मोठा प्रभाव आहे, तिथे सर्व काही त्यांच्या इशाऱ्यावर होऊ शकते. कोणत्या सामन्यात कोण पंचगिरी करेल? कोणाला किती गुण दिले जातील? मॅट चेअरमन कोण असेल? हे सर्व त्यांच्या आणि त्यांच्या लोकांच्या नियंत्रणात असू शकते. विनेश ५७ किलो वजनी गटातून पुन्हा एकदा आखाड्यात उतरणार आहे. पण या वातावरणात आपण १०० टक्के कामगिरी करू शकणार नाही, अशी भीती तिने व्यक्त केली आहे.

राजकारण आणि कुस्तीमधील संघर्ष

ऑक्टोबर २०२४ मध्ये हरियाणातील जुलाना मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकून आमदार बनलेली विनेश फोगाट आता पुन्हा एकदा कुस्तीच्या मैदानात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ नंतर ही तिची पहिली मोठी स्पर्धा असेल. तिने स्पष्ट केलं की, तिला कोणतीही विशेष सुविधा नको आहे, फक्त खेळाडूंच्या मेहनतीचं खरं फळ मॅटवर दिसावं, एवढीच अपेक्षा आहे.

Web Title : विनेश फोगाट का खुलासा: मैं भी यौन उत्पीड़न का शिकार।

Web Summary : विनेश फोगाट ने खुलासा किया कि वह बृजभूषण सिंह द्वारा यौन उत्पीड़न की शिकार छह पहलवानों में से एक हैं। सिंह के गढ़ में प्रतियोगिता में निष्पक्ष खेल को लेकर चिंताएं हैं। उन्होंने अपनी टीम की सुरक्षा के लिए डर जताया, सरकार से पारदर्शिता और जवाबदेही की मांग की।

Web Title : Vinesh Phogat reveals she is a victim of sexual harassment.

Web Summary : Vinesh Phogat disclosed she's among six wrestlers sexually harassed by Brij Bhushan Singh. Concerns arise over fair play at a competition in Singh's stronghold. She fears for her team's safety, demanding transparency and accountability from the government.