अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 19:52 IST2026-05-03T19:51:34+5:302026-05-03T19:52:21+5:30

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांस रविवारी दुपारी अटक केली आहे.

Minor girl raped by father daughter pregnant father arrested | अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक

अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक


लातूर : जळकोट तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी जळकोट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या तपासादरम्यान, पिताच आरोपी असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांस रविवारी दुपारी अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले, तालुक्यातील माळहिप्परगा येथील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञाताने अत्याचार करुन गर्भवती केल्याची तक्रार पिडित मुलीच्या आईने जळकोट पोलिसांत १७ एप्रिल रोजी दिली होती. त्यावरुन जळकोट पोलिसांत अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

उपविभागीय पोलिस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली जळकोटचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास गतिमान पध्दतीने केला. तेव्हा संशयाची सुई घरातच फिरू लागल्याने पोलिसांनी मुलीच्या वडिलांना ताब्यात घेतले. दरम्यान, सरकारी रुग्णालयात मुलीची तपासणी झाली असता ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी रविवारी आरोपी पित्यास अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

Web Title : नाबालिग बेटी से बलात्कार के आरोप में पिता गिरफ्तार, बेटी गर्भवती।

Web Summary : लातूर के जलकोट में एक पिता को अपनी 14 वर्षीय बेटी के साथ बार-बार बलात्कार करने के आरोप में गिरफ्तार किया गया है, जिसके परिणामस्वरूप वह गर्भवती हो गई। पुलिस जांच में एक अज्ञात हमलावर की शुरुआती रिपोर्ट के बाद उसकी सच्चाई सामने आई। वह अब पुलिस हिरासत में है।

Web Title : Father arrested for raping minor daughter, who is pregnant.

Web Summary : A father in Jalkot, Latur, was arrested for repeatedly raping his 14-year-old daughter, resulting in her pregnancy. Police investigations revealed his guilt after initial reports of an unknown assailant. He is now in police custody.