रेल्वे प्रवासादरम्यान अनेकांच्या मनात चहा, पाणी अथवा नाश्ता विकत घेताना किमतींसंदर्भात शंका उत्पन्न होते. कधी चहा महाग दिला जातो तर कधी पाण्याच्या बाटलीवरील छापील किमतीपेक्षा अधिक पैसे मागीतले जातात. अनेकदा माहिती नसल्याने प्रवासी पैसे देऊन मोकळे होतात. मात्र भारतीय रेल्वेने या सर्व वस्तूंचे दर आधीच निश्चित केले आहेत. जाणून घेऊयात रेल्वेतील खाण्यापिण्याच्या किंमतीचे अधिकृत दर...
असे आहेत IRCTC चे अधिकृत दर -प्रवाशांची फसवणूक होऊ नये, यासाठी भारतीय रेल्वेने चहा, कॉफी, सूप आदी वस्तूंचे दर निश्चित केले आहेत. नियमानुसार, १५० मिलीच्या सामान्य चहाची किंमत रेल्वे स्थानक अथवा ट्रेनमध्ये केवळ ५ रुपये एवढी आहे. तर टी-बॅग असलेला चहा (१५० मिली) १० रुपयांना मिळतो.
एक लिटर पाण्याची बाटनी १४ रुपयांना - याशिवया, इंस्टंट कॉफी (१५० मिली) १० रुपयांना मिळते, तर वेंडिंग मशीनमधून मिळणारा चहा (१००-१२० मिली) देखील १० रुपयांतच मिळतो. याशिवाय १२० मिली कॉफी किंवा १०० मिली सूपची किंमत प्रत्येकी १५ रुपये एवढी आहे. प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून 'रेल्वे नीर'च्या बाटल्यांचे दरही निश्चित केले आहेत. रेल्वे नीरची १ लिटरची बाटली १४ रुपयांना तर ५०० मिलीची बाटली ९ रुपयांना मिळते.
या सर्व वस्तूंचे दर निश्चित करण्याचा उद्देश प्रवाशांना योग्य किमतीत दर्जेदार सुविधा देणे असा आहे. यामुळे आपण पुढच्या वेळी जेव्हा केव्हा रेल्वेने प्रवास कराल, तेव्हा हे दर लक्षात ठेवा. अथवा शंका असल्यास संबंधित विक्रेत्याला अधिकृत दर विचारा आणि मगच पैसे द्या.
Web Summary : Beware of overcharging on trains! IRCTC sets fixed rates for tea (₹5-₹10), coffee (₹10-₹15), and Rail Neer (₹14/liter). Stay informed, ask for official rates, and avoid getting ripped off during your journey.
Web Summary : ट्रेनों में ज़्यादा पैसे देने से बचें! IRCTC ने चाय (₹5-₹10), कॉफी (₹10-₹15) और रेल नीर (₹14/लीटर) के दाम तय किए हैं। जानकारी रखें, आधिकारिक दरें पूछें और यात्रा के दौरान ठगे जाने से बचें।