Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे महामार्गावर उभारण्यात आलेल्या मिसिंग लिंकवर फोटो आणि सेल्फी घेण्यासाठी लोक वाहने थांबवत असल्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होऊन अपघात होण्याची भीती असून, यासंदर्भात आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले असून, नागरिकांना मिसिंग लिंकवर न थांबवण्याचे आवाहन केले आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक) लोकार्पणानंतर वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र, प्रवासादरम्यान सेल्फी, फोटो, घेण्यासाठी वाहन चालक केबल स्टेड ब्रिज व बोगद्याजवळ वाहने थांबवत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. द्रुतगती मार्गावर वाहने थांबवण्यास परवानगी नसून वाहनधारकांसाठी अपघाताचा धोका असल्याने ते टाळावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे.
वाहनांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर
महामार्ग पोलिसांनी अधिसूचनेद्वारे मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंक प्रकल्पासाठी वेग मर्यादा जाहीर केली आहे. बोगद्यात हलक्या मोटार वाहनांसाठी ताशी १०० किमी वेग मर्यादा आणि बस व प्रवासी वाहनांसाठी ताशी ८० किमी वेग निश्चित केला आहे. कनेक्टिंग लिंक प्रकल्पातील दोन बोगदे व दोन पुलावर पूर्णपणे २४x७ सीसीटीव्ही यंत्रणेचे लक्ष आहे.
मिसिंग लिंकवर थांबले तर दंड वसूल करणार
सेल्फी, फोटो आणि रिल्स काढण्यासाठी थांबल्यास मोठ्या दंडाची आकारणी केली जाईल. बेजबाबदार वर्तनाने अपघाताचा धोका होऊ शकतो हे लक्षात घेऊन वाहनधारक, प्रवाशांनी नियमांचे पालन करावे आणि सुरक्षित प्रवास करावा, असेही एमएसआरडीसीने म्हटले आहे.
Web Summary : MSRDC warns against stopping on the Mumbai-Pune Missing Link for photos. Violators face fines due to safety risks. CCTV surveillance is in place.
Web Summary : मुंबई-पुणे मिसिंग लिंक पर फोटो लेने के लिए रुकने पर एमएसआरडीसी की चेतावनी। सुरक्षा जोखिमों के कारण उल्लंघनकर्ताओं पर जुर्माना लगेगा। सीसीटीवी निगरानी जारी है।