IPL 2026 Gujarat Titans Won By 4 Wkts Against Punjab Kings : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या पंजाबविरुद्धच्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरनं उत्तुंग षटकार मारत गुजरात टायटन्सच्या संघाला ४ विकेट्सनी विजय मिळवून दिला. या सामन्यातील विजयासह २ गुण खात्यात जमा करत शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाने १२ गुणांची कमाई करत प्लेऑफ्सच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. पंजाबच्या संघाचा यंदाच्या हंगामातील हा दुसरा पराभव असून १३ गुणांसह ते अजूनही गुणतालिकेत अव्वलस्थानावर विराजमान आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
४७ धावांत पंजाबचा अर्धा संघ परतला होता तंबूत
गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार शुभमन गिलनं घरच्या मैदानातील सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराज, जेसन होल्डर आणि कगिसो रबाडाने कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत पंजाबला धक्क्यावर धक्के दिले. ९ व्या षटकात ४७ धावांत कर्णधार श्रेयस अय्यरसह पंजाब किंग्सचा अर्धा संघ तंबूत परतला होता.
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
PBKS कडून सूर्यांश शेडगेचं दमदार अर्धशतक, गोलंदाजीत GT कडून जेसन होल्डरचा 'चौकार'
संघ अडचणीत असताना सूर्यांश शेडगे आणि मार्कस स्टॉयनिस जोडी जमली. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ४४ चेंडूत ७९ धावांची भागीदारी रचली. सूर्यांश शेडगे याने २९ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ५७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मार्कस सॉयनिसनं ३१ चेंडूत केलेल्या ४० धावा आणि मार्को यान्सेन याने ११ चेंडूत २० धावांचे दिलेले योगदान याच्या जोरावर पंजाब किंग्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात १६३ धावा केल्या होत्या. गुजरातच्या संघाकडून जेसन होल्डरनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. याशिवाय सिराज, रबाडा यांनी प्रत्येकी २-२ तर राशिद खान याने एक विकेट घेतली.
साई सुदर्शनचे आश्वासक अर्धशतक, वॉशिंग्टन सुंदरनं षटकारासह संपवली मॅच
पंजाब किंग्सने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची सुरुवात खराब झाली. कर्णधार शुभमन गिल अवघ्या ५ धावांवर बाद झाला. अर्शदीप सिंगने पंजाबला ही महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली. विजयकुमार वैशाकनं जोस बटलरला २६ धावांवर तंबूचा रस्ता दाखवल्यावर मार्कस स्टॉयनिसनं पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या निशांत सिंधुला १५ धावांवर चालते केले. साई सुदर्शन ४१ चेंडूत ५७ धावांवर विजयकुमार वैशाकचा शिकार झाला. या विकेटनंतर सामना पंजाब किंग्सच्या बाजूनं फिरला होता. पण वॉशिंग्टन सुंदरनं अप्रतिम खेळी करत शेवटर्यंत थांबला. राहुल तेवतिया २ (६) आणि जेसन होल्डर ५ (७) यांची विकेट पडल्यावर गुजरात टायन्सवरील दबाव वाढला होता. पण अखेरच्या षटकात अर्शद खान याने ५ चेंडूत ८ धावांचे योगदान दिले. दुसऱ्या बाजूला षटकार मारत मॅच संपवणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरनं २३ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४० धावांची नाबाद खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पंजाबकडून अर्शदीप सिंग आणि विजयकुमार वैशाक यांनी प्रत्येकी २-२ तर मार्कस स्टॉयनिस आणि मार्को यान्सेन यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
Web Summary : Washington Sundar's last-over six secured Gujarat Titans a 4-wicket victory against Punjab Kings. Sai Sudarshan's fifty and Holder's 4 wickets were also vital. Punjab's Suryansh Shegde hit a fifty in a losing cause.
Web Summary : वॉशिंगटन सुंदर के आखिरी ओवर के छक्के से गुजरात टाइटन्स ने पंजाब किंग्स को 4 विकेट से हराया। साई सुदर्शन का अर्धशतक और होल्डर के 4 विकेट भी महत्वपूर्ण थे। पंजाब के सूर्यांश शेडगे ने हार में अर्धशतक लगाया।