नवी दिल्ली : दिल्लीतील शाहदरा भागात विवेक विहारमध्ये चार मजली निवासी इमारतीला रविवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत चार पुरुष, चार महिला आणि दीड वर्षाच्या मुलासह नऊ जणांचा मृत्यू झाला. एसीच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची माहिती आहे.
दिल्ली अग्निशामक दलाच्या सूत्रांनुसार, पहाटे पावणेचारच्या सुमारास आगीची माहिती मिळताच अग्निशामक बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले. चार तासांच्या प्रयत्नांनंतर सकाळी ८च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. इमारतीत अडकलेल्या दहा ते पंधरा जणांना वाचवण्यात आले असून त्यापैकी दोघे जखमी आहेत.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
मृतांमध्ये एकाच कुटुंबातील अनेक जण
दुसऱ्या मजल्यावर अरविंद जैन (६०), त्यांची पत्नी अनिता जैन (५८), मुलगा निशांत जैन (३५), सून अंचल जैन (३३) आणि नातू आकाश जैन यांचे मृतदेह सापडले. तर, तिसऱ्या मजल्यावर नितीन जैन (५०), त्यांची पत्नी शैले जैन (४८) आणि मुलगा सम्यक जैन (२५) हे मृतावस्थेत आढळले. पहिल्या मजल्यावर शिखा जैन (४५) मृतावस्थेत आढळल्या. तर, पती नवीन जैन (४८) जखमी आहेत.
कोळसा झाला... कोण कुठला, डीएनए सांगेल
दिल्ली पोलिसांनुसार, इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक, दुसऱ्या मजल्यावर पाच आणि बंद असलेल्या जिन्यावर तीन मृतदेह आढळले. आग लागल्यानंतर लोकांनी जीव वाचवण्यासाठी छतावर जाण्याचा प्रयत्न केला.
पण छताच्या दरवाज्याला कुलूप होते. त्यामुळे ते तिथेच अडकले. बहुतेक मृतदेह इमारतीच्या मागील भागात सापडले. काही नागरीक इतक्या मोठ्या प्रमाणात जळाले की त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. डीएनए चाचणीनंतर त्यांची ओळख पटेल.
Web Summary : A devastating fire in Delhi's Vivek Vihar, triggered by an AC explosion, claimed nine lives, including a child found embraced by his mother. Firefighters rescued ten to fifteen people after a four-hour battle. Many victims were from the same family; DNA will be used for identification.
Web Summary : दिल्ली के विवेक विहार में एसी विस्फोट से लगी भीषण आग में नौ लोगों की जान चली गई, जिसमें एक बच्चा भी शामिल है जो अपनी माँ की बाहों में पाया गया। दमकल कर्मियों ने चार घंटे की मशक्कत के बाद दस से पंद्रह लोगों को बचाया। कई पीड़ित एक ही परिवार के थे; डीएनए से पहचान होगी।