शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 00:57 IST

Mansarovar Yatra : "लिपुलेख खिंडीचा मार्ग हा काही नवा नाही. १९५४ पासून हा मार्ग कैलास मानसरोवर यात्रेचा मुख्य मार्ग राहिला आहे. गेल्या अनेक दशकांपासून याच मार्गाने यात्रा होत आहे."

नेपाळच्या बालेन सरकारने, भारताच्या कैलास मानसरोवर यात्रेवर घेतलेल्या आक्षेपाला भारत सरकारने रोखठोक उत्तर दिले आहे. "लिपुलेख खिंडीचा मार्ग हा काही नवा नाही. १९५४ पासून हा मार्ग कैलास मानसरोवर यात्रेचा मुख्य मार्ग राहिला आहे. गेल्या अनेक दशकांपासून याच मार्गाने यात्रा होत आहे. या विषयावर भारताची भूमिका नेहमीच स्पष्ट आणि सुसंगत राहिली आहे," असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी स्पष्ट केले आहे. 

हे दावे ना ऐतिहासिक तथ्यांवर आधारित, ना पुराव्यांवर आधारित -जायस्वाल पुढे म्हणाले, "अशा पद्धतीचे दावे न्यायसंगत नाहीत. हे दावे कुठल्याही ऐतिहासिक तथ्यांवर अथवा पुराव्यांवर आधारित नाहीत. प्रादेशिक दाव्यांचा अशा प्रकारे केलेला 'एकतर्फी कृत्रिम विस्तार' कुठल्याही परिस्थितीत मान्य नाही." एवढेच नाही तर, प्रलंबित सीमा प्रश्नांवर भारत नेपाळसोबत रचनात्मक चर्चेसाठी आणि कूटनैतिक संवादातून तोडगा काढण्यासाठी नेहमीच तयार आहे, असेही जायस्वाल यांनी यावेळी स्पष्ट केले.

काय होता नेपाळचा आक्षेप? -यात्रेचा मार्ग निश्चित करण्यापूर्वी काठमांडूशी चर्चा केली नाही, असे म्हणत नेपाळने नाराजी व्यक्त केली होती. भारताने जून ते ऑगस्ट या कालावधीत यात्रेची घोषणा करताच, नेपाळने लिपुलेखवर आपला हक्क सांगत विरोध दर्शवला होता. मात्र, भारताने नेपाळचा हा विरोध फेटाळून लावला आहे.

हेही वाचा - Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा

लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी आमचेच -नेपाळच्या परराष्ट्रमंत्रायलयाने यासंदर्भात सोशल मीडियावर एक निवेदन जारी केले होते. यात त्यांचे म्हटले होते, "१८१६ च्या सुगौली संधीनुसार महाकाली नदीच्या पूर्वेकडील लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी हे नेपाळचे अविभाज्य भाग आहेत. बालेन शाह यांच्या सरकारने केवळ यात्रेलाच नाही, तर भारताने या मार्गाने चीनशी व्यापार सुरू करण्याच्या निर्णयावरही तीव्र नाराजी व्यक्त केली. 

याशिवाय, नेपाळ सरकारने यापूर्वीही भारताला या वादग्रस्त भागात रस्ते बांधणी किंवा तीर्थयात्रा यांसारख्या हालचाली न करण्याची विनंती केली होती. नेपाळच्या मते, हा भाग त्यांचा असल्याने कोणत्याही परकीय देशाचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. चीनलाही 'मित्र देश' म्हणून नेपाळने लिपुलेखच्या मालकी हक्काबाबत अधिकृतपणे कळवले आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : India Firmly Rejects Nepal's Objection to Kailash Mansarovar Yatra Route

Web Summary : India refuted Nepal's objection to the Kailash Mansarovar Yatra via Lipulekh, a route used since 1954. India dismissed Nepal's territorial claims as baseless and unacceptable, reaffirming its readiness for constructive dialogue to resolve border issues diplomatically.
टॅग्स :IndiaभारतNepalनेपाळborder disputeसीमा वाद