शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 09:02 IST

Kerala election Results 2026: केरळ विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसने सत्ताधारी आघाडीला मागे टाकत घौडदौड सुरू केली आहे. 

Kerala Election Results 2026 Update: केरळमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरूवात झाली. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडी आणि सलग दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या डाव्या लोकशाही आघाडी यांच्यात थेट लढत होत असून, सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसच्या आघाडीने जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपाही सात जागांवर आघाडीवर आहे. 

केरळमध्ये १४० जागांसाठी निवडणूक होत आहे. १४० जागांसाठी ८८३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, ४३ ठिकाणी असलेल्या १४० केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे. मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस प्रणित आघाडी पुढे आहे. 

नऊ वाजेपर्यंत ३२ जागांचे कल समोर आले. यात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीने १८ जागांवर आघाडी घेतली. तर सत्ताधारी डावी लोकशाही आघाडी ६ जागांवर पुढे आहे. तर १ जागेवर अपक्ष उमेदवाराने आघाडी घेतली आहे. 

१९६० असं पहिल्यांदाच होणार

डाव्या लोकशाही आघाडीचा पराभव झाला, तर यामुळे राजकीय इतिहासात नवी नोंद होणार आहे. १९६० नंतर पहिल्यांदाच असं होईल की डावी लोकशाही आघाडी देशातील कोणत्याही राज्यात सत्तेत नसेल. 

दुसरीकडे मागील काही वर्षांपासून केरळात पाय रोवू इच्छिणाऱ्या भाजपाने यावेळी बरीच ताकद लावली आहे. २०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला एकही जागा मिळाली नव्हती. मात्र, यावेळी भाजपाने आपला मत टक्का आणि वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये भाजपासाठी चांगली बातमी दिसत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Kerala Election 2026: Congress surges ahead; BJP leads in seven seats.

Web Summary : Early trends in Kerala's 2026 election show Congress leading significantly. BJP is also ahead in seven seats. If the Left Democratic Front loses, it would be out of power in all states for the first time since 1960. BJP aims to increase its vote share.
टॅग्स :Kerala Assembly Election 2026केरळ विधानसभा निवडणूक २०२६congressकाँग्रेसElectionनिवडणूक 2026BJPभाजपा