अभिनेता रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहुर्तावर सिनेमा रिलीज झाला. सिनेमातील भव्यता, स्क्रीनवर फारसा दाखवला न गेलेला इतिहासाचा तो भाग, म्युझिक अशा अनेक कारणांमुळे सिनेमाची चर्चा आहे. एकीकडे ट्रोलिंग होत असतानाही दुसरीकडे सिनेमाची यशस्वी घौडदौड सुरु आहे. सिनेमाचं वीकेंड कलेक्शन किती जाणून घ्या.
रितेश देशमुख आणि टीम गेल्या १० वर्षांपासून सिनेमावर मेहनत घेत होती. त्याचंच फळ आज त्यांना मिळत आहे. 'शिवबा' ते 'राजा शिवाजी' अशी कथा सिनेमात दाखवण्यात आली आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक सुरुवातही केली आहे. सॅल्कनिक रिपोर्टनुसार, पहिल्या दिवशी सिनेमाने ११.३५ कोटी कमावले. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी १०.५५ कोटींचा बिझनेस केला. काल रविवारी तिसऱ्या दिवशी तब्बल १२ कोटींचा गल्ला जमवला. यासोबत सिनेमाने तीन दिवसात २० कोटींची कमाई केली आहे. हे मराठीतलं कलेक्शन आहे. तर हिंदीत सिनेमाने एकूण २९.६५ कोटी कमावले आहेत. यासोबत हा सिनेमा यावर्षीचा मराठीतील सर्वात कमाई करणारा दुसरा सिनेमा ठरला आहे.
'राजा शिवाजी' सिनेमातील मराठी संवाद प्राजक्त देशमुखने लिहिले आहेत. तर अजय अतुलचं संगीत तुफान गाजत आहे. सिनेमात शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराजांबद्दलही दाखवण्यात आल्याने रितेशचं कौतुक होत आहे. जिनिलिया राणी सईबाईच्या भूमिकेत आहे. तर अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन, फरदीन खान या हिंदी कलाकारांची फौज आहे. सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी हे मराठी कलाकारही आहेत. विशेष म्हणजे रितेशच्या दोन्ही मुलांनीही सिनेमात भूमिका साकारली आहे. तसंच सलमान खानचा जिवा महालाच्या भूमिकेत कॅमिओ आहे. एकूणच सिनेमाची भव्यता पाहून प्रेक्षकांचे डोळे दीपले आहेत.
सोशल मीडियावर तर 'राजा शिवाजी' सिनेमाचीच हवा दिसत आहे. अनेक प्रेक्षक अभिमानाने सिनेमा पाहताना व्हिडीओ रेकॉर्ड करुन पोस्ट करत आहेत. मात्र रितेशने 'असं करु नका' हे भावनिक आवाहन प्रेक्षकांना केलं आहे. सिनेमातील व्हिडीओ आधीच इंटरनेटवरुन पाहून ज्यांना प्रत्यक्षात जाऊन सिनेमा पाहायची इच्छा आहे त्यांना मजा येणार नाही असं तो म्हणाला.
Web Summary : Riteish Deshmukh's 'Raja Shivaji' earns big at the box office. The film grossed ₹20 crore in Marathi and ₹29.65 crore in Hindi over the weekend, becoming the year's second-highest Marathi grosser. Prajakt Deshmukh wrote dialogues, Ajay-Atul composed music, and features star-studded cast.
Web Summary : रितेश देशमुख की 'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिस पर छाई। फिल्म ने वीकेंड पर मराठी में ₹20 करोड़ और हिंदी में ₹29.65 करोड़ कमाए, जो इस साल की दूसरी सबसे बड़ी मराठी फिल्म बन गई। संवाद प्राजक्त देशमुख ने लिखे, अजय-अतुल ने संगीत दिया, और कलाकारों की भरमार है।