"मला तुमच्या भावना समजत आहेत, पण एक विनंती..."; 'राजा शिवाजी'च्या रिलीजनंतर रितेश देशमुख काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 15:34 IST2026-05-02T15:32:29+5:302026-05-02T15:34:04+5:30

Riteish Deshmukh on Raja Shivaji: 'राजा शिवाजी' सिनेमा रिलीज होऊन एक दिवस होत नाही तोच रितेश देशमुखचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात रितेशने प्रेक्षकांना कळकळीची विनंती केली आहे. रितेशचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. काय म्हणाला रितेश?

What did Riteish Deshmukh say after the release of raja shivaji movie | "मला तुमच्या भावना समजत आहेत, पण एक विनंती..."; 'राजा शिवाजी'च्या रिलीजनंतर रितेश देशमुख काय म्हणाला?

"मला तुमच्या भावना समजत आहेत, पण एक विनंती..."; 'राजा शिवाजी'च्या रिलीजनंतर रितेश देशमुख काय म्हणाला?

'राजा शिवाजी' सिनेमाची १ मे २०२६ ला सगळीकडे रिलीज झाला आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक हाउसफुल्ल गर्दी करत आहेत. अशातच 'राजा शिवाजी' सिनेमा रिलीज होऊन एक दिवस होत नाही तोच रितेश देशमुखचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात रितेशने प्रेक्षकांना कळकळीची विनंती केली आहे. रितेशचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. काय म्हणाला रितेश? जाणून घ्या

रितेशचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत

रितेश देशमुख व्हिडीत म्हणतो की, ''नमस्कार, आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवरती चित्रपट आम्ही काढला 'राजा शिवाजी'. आणि हा चित्रपट स्वतःचा समजून तुम्ही पाहायला गेलात. एवढा उत्स्फुर्त प्रतिसाद तुम्ही या चित्रपटाला देत आहात, त्याबद्दल मी आणि 'राजा शिवाजी' चित्रपटाची संपूर्ण टीम तुम्हा सर्वांची ऋणी आहे.''


''फक्त एक विनंती आहे, मला तुमच्या भावना समजत आहेत की तुम्ही एक्साइटमेंटमुळे चित्रपटाचे थिएटरमध्ये व्हिडीओ काढताय, ते बाहेर पोस्ट करताय. फक्त एवढी विनंती करतो की, व्हिडीओज पोस्ट करु नका. स्टील्स (फोटो) वाटेल तर तुम्ही पोस्ट करा हरकत नाही. परंतु कृपया व्हिडीओ पोस्ट करु नका. कारण का, त्यामुळे इतर जे चित्रपट पाहायला येणार आहेत त्यांना काही काही सरप्राईजेस आहेत. त्यांनाही मजा येऊ द्या. आणि असाच तुमचा प्रतिसाद असू द्या. जय शिवराय'', अशाप्रकारे रितेशने प्रेक्षकांना विनंती केली आहे

'राजा शिवाजी'ची कमाई

सैकनिल्कच्या अहवालानुसार 'राजा शिवाजी' सिनेमाने पहिल्याच दिवशी तब्बल १२. ४० कोटींचा गल्ला जमवला आहे. पहिल्याच दिवशी तब्बल १२.४० कोटींची कमाई करत कोणत्याही मराठी सिनेमासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग डे नोंदवला आहे. त्याचबरोबर, हा चित्रपट २०२६ मधील सर्व चित्रपटांमध्ये तिसरा सर्वाधिक ओपनिंग डे ठरला आहे. 

Web Title : 'राजा शिवाजी' की रिलीज के बाद रितेश देशमुख ने प्रशंसकों से की अपील।

Web Summary : 'राजा शिवाजी' की रिलीज के बाद, रितेश देशमुख ने प्रशंसकों से फिल्म के वीडियो ऑनलाइन पोस्ट न करने का अनुरोध किया, ताकि अन्य दर्शकों के लिए आश्चर्य बना रहे। फिल्म ने पहले दिन ₹12.40 करोड़ कमाए।

Web Title : Ritesh Deshmukh appeals to fans after 'Raja Shivaji' release.

Web Summary : Following the release of 'Raja Shivaji,' Ritesh Deshmukh requested fans not to post movie videos online, preserving surprises for other viewers. The film earned ₹12.40 crore on its opening day.