'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 16:05 IST2026-05-02T16:04:12+5:302026-05-02T16:05:18+5:30

Wedding News: वेगवेगळ्या कारणांमुळे ऐन मुहुर्तावर लग्नमंडपातच लग्न मोडल्याच्या घटना हल्ली सर्रास कानावर येतात. अशीच एक घटना नुकतीच मध्य प्रदेशमधील शहडोल जिल्ह्यात घडली आहे.

'The boy you showed me was like a hero, this is not him', the bride's complaint, she immediately called the police, then... | 'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...

'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...

वेगवेगळ्या कारणांमुळे ऐन मुहुर्तावर लग्नमंडपातच लग्न मोडल्याच्या घटना हल्ली सर्रास कानावर येतात. अशीच एक घटना नुकतीच मध्य प्रदेशमधील शहडोल जिल्ह्यात घडली आहे. येथे लग्न लागलं असतानाच अचानक नवरीने स्टेजवरून खाली उतरून थेट पोलिसांनाच बोलावले. तसेच माझं लग्न ज्याच्यासोबत ठरलं होतं. तो हा मुलगा नाही असा दावा केला. त्यामुळे उपस्थित वऱ्हाडी मंडळी अवाक झाली. अखेरीस खूप वादविवादांनंतर लग्न न लावताच वऱ्हाड माघारी परतलं. आता परिसरात या घटनेची एकच चर्चा सुरू आहे. 

ही घटना शहडोल जिल्ह्यातील गोहपारू परिसरा घडली आहे. येथे एका लग्नात नवरदेवाने वधूच्या गळ्यात माळ घातली. मात्र नवऱ्याला माळ घालण्याची वेळ आली तेव्हा नवरीने बारकाईने पाहिले. तसेच नवरदेवाच्या गळ्यात माळ न घालताच स्टेजवरून खाली उतरली. लग्न ठरवताना मला जो मुलगा दाखवण्यात आला होता तो मुलगा हा नाही, असा दावा तिने केला. कुटुंबीयांनी तिची खूप समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ती आपल्या मतावर ठाम राहिली. अखेरीस पोलिसांना बोलावण्यात आले. तेव्हा पोलिसांसमोरही या वधूने तेच सांगितले. मला जो मुलगा दाखवला तो हिरोसारखा होता. हा तो मुलगा नाही त्यामुळे मी याच्यासोबत लग्न करणार नाही, अशी भूमिका तिने घेतली.

या नववधूने घेतलेल्या भूमिकेमुळे लग्नमंडपात एकच गोंधळ उडाला. वर पक्षानेही तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आम्ही तर हुंडाही मागितलेला नाही, मग लग्न का थांबवतेयस? असे त्यांनी तिला विचारले. मात्र ती ऐकून घेण्याच्या स्थितीत नव्हती. अखेरीस पोलिसांनी दोन्ही पक्षांकडून परस्पर सहमतीने लग्न थांबवत असल्याचे लिहून घेतले. त्यानंतर वधूशिवायच वऱ्हाडी मंडळी माघारी फिरली आणि लग्नासाठी केलेला खर्चही वाया गेला. आता या घटनेची एकच चर्चा नातेवाईकांमध्ये आणि आजूबाजूच्या गावांमध्ये सुरू आहे.  
 

Web Title : दुल्हन ने शादी से इनकार किया, कहा दूल्हा वो नहीं जो दिखाया गया था।

Web Summary : मध्य प्रदेश में दुल्हन ने शादी रोक दी, दावा किया कि दूल्हा वो नहीं है जो उसे दिखाया गया था। हंगामे के बीच पुलिस ने हस्तक्षेप किया। शादी रद्द कर दी गई; दूल्हे वाले बिना दुल्हन के लौट गए, जिससे स्थानीय चर्चा शुरू हो गई।

Web Title : Bride refuses to marry, claims groom is not the one shown.

Web Summary : Madhya Pradesh bride halted wedding, claiming groom wasn't the man she was shown. Police intervened as chaos erupted. The wedding was called off; the groom's party returned without a bride, sparking local buzz.