उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 16:35 IST2026-05-02T16:33:08+5:302026-05-02T16:35:04+5:30

कॅम्प नं-५, नेताजी चौकात दोन गटात मुलीच्या वादातून रक्तरंजित राड्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे.

Ruckus over girl's dispute at Netaji Chowk in Ulhasnagar, youth stabbed in stomach and attempted to kill | उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 

उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 

उल्हासनगर : कॅम्प नं-५, नेताजी चौकात दोन गटात मुलीच्या वादातून रक्तरंजित राड्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. ५ जणांच्या टोळक्याने, एका तरुणाच्या छातीत चाकू भोसकल्याने, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी काही हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-५, नेताजी चौकात शुभंम वाघे याची पुर्वीची प्रेमिका पुजा हिचा प्रियकर रोहित याने शुभंम याला शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता नेताजी चौकात चहा पिण्यासाठी बोलावले. त्यानुसार शुभंम हा भाऊ गणेश व एका मित्रासह चौकात गेला. त्यावेळी आलेल्या रोहित याने पुजा तुझी कोण लागते? असा प्रश्न शुभम याला केला. 'ती माझी गर्लफ्रेन्ड होती, पण आता आमचे ब्रेकअप झाले आहे', असे त्याने सांगितले. 

त्यावर शुभम याने रोहितला विचारले की, “पुजा तुझी कोण आहे, तर तो म्हणाला की, माझी ती आयटम आहे. असे बोलला. त्यावेळी दोघात वाद झाल्यावर रोहितसह त्याच्या मित्राने शुभम वाघे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यातून शुभंम पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र भाऊ गणेश वाघे यांच्या पोटात चाकू मारून हल्लेखोर पळून गेले. गणेश यांच्या पोटातील चाकू काढण्यास मध्यवर्ती रुग्णालयाला यश आले नसून त्याला कळवा रुग्णालयाला हलविले. त्याची तब्येत गंभीर झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकारणी रोहितसह पाच जणावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title : उल्हासनगर: लड़की के विवाद में चाकूबाजी, युवक गंभीर रूप से घायल।

Web Summary : उल्हासनगर में एक लड़की को लेकर हुए विवाद में हिंसक हमला हुआ। एक युवक के पेट में चाकू मारा गया और वह गंभीर रूप से घायल हो गया। पुलिस ने कुछ संदिग्धों को गिरफ्तार किया है और जांच कर रही है।

Web Title : Ulhasnagar: Girl dispute leads to stabbing; man critically injured.

Web Summary : In Ulhasnagar, a dispute over a girl led to a violent attack. A young man was stabbed in the abdomen and critically injured. Police have arrested some suspects and are investigating.