शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
3
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
4
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
5
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
6
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
7
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
8
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
10
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
11
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
12
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
13
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
14
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
15
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
16
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
17
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
18
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
19
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
20
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 09:53 IST

Mamata Banerjee: पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालाआधी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली असून, सुरुवातीपासूनच सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. मात्र, मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मध्यरात्री सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली. भाजपने ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही कॅमरे बंद केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

"जनतेचा कौल बदलण्यासाठी भाजपच्या सांगण्यावरून स्ट्राँग रूममधील सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड केली जात आहे. ज्याप्रमाणे मी रात्रभर जागी राहून सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे, त्याचप्रमाणे तुम्हीही रात्रभर जागून स्ट्राँग रूमबाहेर पहारा द्या. लोकांच्या मतांचे रक्षण करणे, ही तुमची सर्वात मोठी जबाबदारी आहे", असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. 

ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की,  "जर कुठेही संशयास्पद हालचाली दिसल्या, तर कार्यकर्त्यांनी तात्काळ त्या परिसराला घेराव घालावा. कोणतीही अनियमितता आढळल्यास संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे तातडीने लेखी तक्रार नोंदवावी. जर प्रशासनाकडून तांत्रिक बिघाड किंवा वीज कपातीचे कारण दिले जात असेल, तर ते मान्य न करता तात्काळ सीसीटीव्ही फुटेजची मागणी करावी. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी कार्यकर्त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता सतर्क आणि सक्रिय राहावे."

बंगालमधील वातावरण तापले

ममता बॅनर्जींच्या या विधानानंतर बंगालमधील राजकीय वातावरण मतमोजणीपूर्वीच तापले आहे. एकीकडे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण असतानाच, प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आता या चुरशीच्या लढतीमध्ये बंगालची जनतेने कुणाच्या पारड्यात आपले मत टाकले आहे, हे स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : West Bengal Election Eve Controversy: Mamata Banerjee's Post Sparks Uproar

Web Summary : Mamata Banerjee alleged BJP tampered with CCTV in strong rooms before vote counting. She urged party workers to guard strong rooms and report irregularities, escalating tensions before the West Bengal election results.
टॅग्स :West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाBJPभाजपा