शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 10:49 IST

टीवीकेने निकालात मुसंडी मारली असून अभिनेता विजय यांच्या यशाने सगळेच आश्चर्यचकीत आहेत

तामिळनाडू विधानसभा निवडणूक निकालांमध्ये सत्ताधारी डीएमकेला जोरदार धक्का बसला आहे. याठिकाणी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अभिनेता विजय थलापती यांच्या TVK पक्षाने घवघवीत यश मिळवल्याचे दिसून येते. राज्यातील एकूण २३४ जागांपैकी १०० हून अधिक जागांवर TVK पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. मतमोजणी अद्याप सुरू असून टीवीके १०६, एआयडिएमके - ७४ तर सत्ताधारी डीएमके ५५ जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का

सुरुवातीच्या निकालांमधील कल पाहता डीएमकेच्या चेन्नई येथे विजयी जल्लोष कार्यक्रमावर विरजन पडले आहे. ठिकठिकाणी लावलेले तंबू हटवण्यात आले आहेत. टीवीकेने निकालात मुसंडी मारली असून अभिनेता विजय यांच्या यशाने सगळेच आश्चर्यचकीत आहेत. सुरुवातीला डीएमके आघाडीवर असल्याचे चित्र होते परंतु काही वेळातच अभिनेता विजय यांच्या टीवीके पक्षाने ब्लॉकबस्टर एन्ट्री घेत आघाडीला सुरुवात केली. तामिळनाडूत बहुमतासाठी ११८ जागांची गरज आहे. त्यात १०० हून अधिक जागांवर टीवीके आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ भाजपा एआयडिएमके आघाडीने बाजी मारली आहे तर सत्ताधारी डीएमके तिसऱ्या स्थानावर फेकली आहे. 

यावेळी तामिळनाडूमध्ये एकूण ५ कोटी ७३ लाखाहून अधिक मतदार होते. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार राज्यात यंदा विक्रमी मतदान झाले असून एकूण मतदानाची टक्केवारी ८४.६९ टक्के होती. तामिळनाडूच्या निवडणूक इतिहासातील ही सर्वाधिक मतदानाची टक्केवारी मानली जाते. त्यात पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या टीवीके पक्षाने विद्यमान सत्ताधारी डिएमकेसोबतच एआयडिएमके यांनाही धक्का दिला आहे. अनेक ठिकाणी टीवीकेच्या उमेदवारांनी या प्रमुख पक्षाच्या उमेदवारांना मागे टाकले आहे. 

तामिळनाडूतील मुख्य लढत डीएमके आणि एआयएडीएमके यांच्यात होती. परंतु अभिनेता विजयने स्थापन केलेल्या तामिळगा वेट्टी कझगम (टीवीके) पक्षाने निवडणुकीच्या मैदानात उमेदवार उभे करून अधिक रंजक आणली होती. निवडणुकीनंतरच्या एक्झिट पोलमध्ये विजय यांच्या पक्षाला आघाडी मिळत असल्याचे दिसून आले होते. अभिनेता विजय तामिळनाडूमध्ये किंगमेकरची भूमिका बजावू शकतो असं सांगितले जात होते. परंतु प्रत्यक्ष निकालात विजय यांच्या पक्षाची सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे दिसून येत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Actor Vijay's TVK Party Achieves Milestone, Eyes Majority in Tamil Nadu

Web Summary : In Tamil Nadu, actor Vijay's TVK party made a strong debut, leading in over 100 seats, surprising established parties like DMK and AIADMK. Initial leads showed DMK ahead, but TVK surged. With record voter turnout, TVK is poised to potentially form the government.
टॅग्स :Assembly Election Resultsविधानसभा निवडणूक निकाल २०२६Electionनिवडणूक 2026Tamilnaduतामिळनाडू