SBI Home Loan EMI : भारतीय रिझर्व्ह बँकेनं एप्रिलमध्ये झालेल्या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे होम लोन, कार लोनसह इतर सर्व प्रकारच्या कर्जांच्या व्याजदरात कोणतीही सूट मिळाली नाही, मात्र यामुळे ग्राहकांची निराशाही झाली नाही. विशेष म्हणजे, भारतीय रिझर्व्ह बँकेनं गेल्या वर्षी रेपो रेटमध्ये एकूण १.२५ टक्क्यांची कपात केली होती, ज्यामुळे सर्व प्रकारच्या कर्जांचे व्याजदर कमी झाले होते. सध्या भारतीय स्टेट बँक ७.२५ टक्क्यांच्या सुरुवातीच्या दरानं होम लोन देत आहे.
२५ वर्षांसाठी ५० लाखांचं होम लोन : किती पगार आवश्यक?
भारतीय स्टेट बँक ७.२५ टक्के या सुरुवातीच्या व्याजदरानं गृहकर्ज उपलब्ध करून देत आहे. या व्याजदराने २५ वर्षांच्या कालावधीसाठी ५० लाख रुपयांचे होम लोन घेण्यासाठी तुमची अटी कोणत्या जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
एसबीआयमधून ५० लाखांचं होम लोन घेण्यासाठी तुमचा मासिक पगार किमान ७३,००० रुपये असणे आवश्यक आहे. या गणितानुसार, तुमच्या नावावर दुसरं कोणतंही कर्ज अॅक्टिव्ह नसावं. २५ वर्षांच्या मुदतीसाठी ५० लाख रुपयांच्या कर्जावर तुम्हाला दरमहा सुमारे ३६,५०० रुपये ईएमआय (EMI) भरावा लागेल. गृहकर्जाच्या बाबतीत तुमच्या पगाराचा साधारण अर्धा हिस्सा कर्जाच्या ईएमआयमध्ये जातो.
दर दोन महिन्यांनी होते आरबीआयच्या एमपीसीची बैठक
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची बैठक दर दोन महिन्यांनी आयोजित केली जाते. या बैठकीत गव्हर्नरांसह सर्व मोठे अधिकारी देशाच्या विद्यमान आर्थिक परिस्थितीचा विचार करून रेपो रेटवर निर्णय घेतात. आरबीआयनं एप्रिलमध्ये रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर स्थिर ठेवल्यामुळे ग्राहकांना ज्या दरानं आधी कर्ज मिळत होतं, त्याच दरानं आताही मिळत आहे आणि ईएमआयमध्ये कोणताही बदल झालेला नाही. रिझर्व्ह बँकेची पुढील मॉनेटरी पॉलिसी कमिटीची बैठक आता जूनमध्ये होणार आहे.
Web Summary : SBI offers home loans starting at 7.25%. A ₹50 lakh loan for 25 years requires a minimum ₹73,000 monthly salary, with an approximate ₹36,500 EMI. The RBI's stable repo rate impacts loan interest and EMIs.
Web Summary : एसबीआई 7.25% से शुरू होने वाले होम लोन प्रदान करता है। 25 वर्षों के लिए ₹50 लाख के ऋण के लिए न्यूनतम ₹73,000 मासिक वेतन की आवश्यकता है, अनुमानित ₹36,500 ईएमआई के साथ। आरबीआई की स्थिर रेपो दर ऋण ब्याज और ईएमआई को प्रभावित करती है।