शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 10:57 IST

Jio new recharge plan 2026 : रिलायन्स जिओने आपला लोकप्रिय ₹२०९ चा रिचार्ज प्लॅन बंद केला आहे. या दरवाढीचा ग्राहकांवर काय परिणाम होईल आणि आता नवीन रिचार्ज प्लॅन्स कोणते आहेत, याची सविस्तर माहिती.

मुंबई: टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज कंपनी रिलायन्स जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये मोठी कपात आणि दरवाढ केली आहे. ग्राहकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेला ₹२०९ चा रिचार्ज प्लॅन आता कंपनीने अधिकृतपणे बंद केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १GB डेटा मिळत असे.

जिओने आपल्या टॅरिफ स्ट्रक्चरमध्ये सुधारणा करताना एंट्री-लेव्हलच्या डेली डेटा प्लॅन्सवर मर्यादा आणल्या आहेत. ₹२०९ च्या प्लॅनमध्ये २८ दिवसांची वैधता आणि दररोज १GB डेटा मिळत असे. आता हा प्लॅन बंद झाल्यामुळे, ज्या ग्राहकांना दररोज १GB डेटा हवा आहे, त्यांना आता महागड्या प्लॅन्सची निवड करावी लागणार आहे.

नवीन पर्यायांचा विचार₹२०९ चा प्लॅन बंद झाल्यानंतर, ग्राहकांकडे आता ₹३४९ किंवा त्यापुढील प्लॅन्सचे पर्याय उरले आहेत. कंपनीने आपल्या सरासरी प्रति ग्राहक महसूल वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे समजते. १४ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा १९८ रुपयांचा एक प्लॅन उरला आहे. जो २८ दिवसांसाठी ३९६ रुपयांना पडणार आहे. म्हणजे हा प्लॅन ३४९ दिवसांच्या २८ दिवसांच्या प्लॅनपेक्षा महागडा आहे. 

या बदलाचा कोणाला फटका बसेल?

सर्वात मोठा फटका बजेट ग्राहकांना बसला आहे. जे ग्राहक कमी किमतीत दररोज १GB डेटा वापरत होते. विशेषत: ग्रामीण वापरकर्ते ज्यांचे मोबाईल बजेट मर्यादित आहे. तसेच ऑनलाईन अभ्यासासाठी बेसिक डेटा प्लॅन वापरणाऱ्या विद्यार्थ्यांवर याचा आर्थिक भार पडेल.

दरवाढीचे कारण?टेलिकॉम तज्ज्ञांच्या मते, ५जी सेवांचा विस्तार आणि इन्फ्रास्ट्रक्चरवरील वाढता खर्च भरून काढण्यासाठी जिओने आपल्या स्वस्त प्लॅन्समध्ये वाढ केली आहे किंवा ते बंद केले आहेत. येणाऱ्या काळात इतर टेलिकॉम कंपन्या (एअरटेल आणि व्हीआय) देखील अशाच प्रकारचे निर्णय घेऊ शकतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Jio discontinues ₹209 plan, users to pay more for 1GB data.

Web Summary : Jio has discontinued its popular ₹209 plan offering 1GB daily data. This change impacts budget users, especially in rural areas and students relying on affordable data plans. Users now need to opt for higher-priced plans, like ₹349, for daily 1GB data, increasing their costs.
टॅग्स :JioजिओReliance Jioरिलायन्स जिओ