कोल्हापूर - पतीला भेटण्याच्या बहाण्याने घरात घुसलेल्या तरुणाने डॉक्टर महिलेवर अत्याचार केला. बळजबरीचा व्हिडिओ स्नॅपचॅटवर पाठविला. सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती घालून एक लाख रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी पीडित महिलेने राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संशयित आरोपी शक्ती विक्रम भोसले (वय 35 रा. शाहूपुरी चौथी गल्ली, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली.
राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या ओळखीतील शक्ती भोसले हा ३० एप्रिल रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास महिलेच्या घरी गेला. तुमच्या पतीला भेटण्यासाठी आलो आहे. त्यांच्याशी फोन झाला असून, थोड्या वेळात ते येतील, असे म्हणून तो गप्पा मारत बसला. फिर्यादी महिला सरबत तयार करण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्यानंतर त्याने पाठीमागून जाऊन जबरदस्ती केली. मोबाइलवर त्याचा व्हिडिओ केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास पतीसह दोघांनाही ठार मारीन अशी धमकी दिली.
दुसऱ्या दिवशी रात्री त्याने महिलेच्या 'स्नॅपचॅट'वर जबरदस्तीचा व्हिडिओ पाठविला. पीडितेने शनिवारी रात्री फिर्याद दिली. पोलिसांनी भोसले याला अटक केली असून, न्यायालयात हजर केले असता त्याची पोलिस कोठडीत रवानगी झाली.
व्हिडिओ डिलीट करण्यासाठी मागितली खंडणी
शक्त्ती भोसले याने मोबाइलमध्ये महिलेचे शूटिंग घेतले होते. तो व्हिडिओ स्नॅपचॅटला पाठवून धमकावले. व्हिडिओ डिलीट करण्यासाठी एक लाख रुपयाची मागणी केल्याचा उल्लेख महिलेने फिर्यादीत केला आहे.
Web Summary : Kolhapur: A youth forcibly entered a doctor's home, assaulted her, and filmed the act. He then sent the video via Snapchat and demanded ₹1 lakh, threatening to release it online. Police arrested the accused, Shakti Bhosle.
Web Summary : कोल्हापुर: एक युवक डॉक्टर के घर में जबरदस्ती घुसा, हमला किया और वीडियो बनाया। फिर स्नैपचैट के माध्यम से वीडियो भेजा और ऑनलाइन जारी करने की धमकी देकर ₹1 लाख की मांग की। पुलिस ने आरोपी शक्ति भोसले को गिरफ्तार किया।