तिरुवनंतपुरम: केरळ विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDF ने ऐतिहासिक मुसंडी मारली आहे. १४० जागांच्या विधानसभेत UDF ने १०० जागांचा टप्पा ओलांडला असून सत्ताधारी डाव्या आघाडीला (LDF) मोठा धक्का बसला आहे. पिनरई विजयन यांच्या नेतृत्वाखालील LDF केवळ ४१ जागांवर मर्यादित राहताना दिसत आहे.
मुख्यमंत्री कोण? पेच वाढला!UDF च्या विजयानंतर आता केरळचा पुढचा मुख्यमंत्री कोण, यावर चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये दोन प्रमुख नावे आघाडीवर आहेत. तिरुवनंतपुरममध्ये पोहोचलेल्या शशी थरूर यांनी मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर स्मितहास्य करत सूचक मौन पाळले आहे. "आमदारांशी चर्चा करून हायकमांड अंतिम निर्णय घेईल," असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दिल्लीतील राजकारणात सक्रिय असलेले वेणुगोपाल यांच्या समर्थकांनी केरळच्या रस्त्यांवर मोठे कटआउट्स लावून जल्लोष सुरू केला आहे.
या दोघांव्यतिरिक्त व्ही.डी. सतीशन यांच्या नावावरही पक्षात खल सुरू आहे. नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये थरूर आणि वेणुगोपाल एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा देताना दिसत आहेत.
विपक्षनेत्यांची खोचक टीका"मतमोजणी पूर्ण होण्यापूर्वीच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी लॉबिंग आणि अंतर्गत गटबाजी सुरू झाली आहे," अशी टीका CPI(M) चे सरचिटणीस एम.ए. बेबी यांनी केली आहे. मुस्लिम लीग सारखे मित्रपक्षही आपल्या पसंतीचा मुख्यमंत्री लादण्याचा प्रयत्न करत असल्याचे संकेत मिळत आहेत.
१० वर्षांनंतर परंपरेची पुनरावृत्तीकेरळमध्ये दर ५ वर्षांनी सत्ता बदलण्याची परंपरा २०१६ मध्ये खंडित झाली होती, जेव्हा पिनरई विजयन सलग दुसऱ्यांदा निवडून आले होते. मात्र, आता १० वर्षांनंतर काँग्रेसने पुन्हा मुसंडी मारत केरळचा गड सर केला आहे. २०१६ मध्ये ओमान चंडी यांच्या पराभवानंतर काँग्रेसला सत्तेची प्रतीक्षा होती, जी आता संपली आहे.
Web Summary : UDF's Kerala victory sparks CM race. Shashi Tharoor remains coy. Internal lobbying intensifies with names like Venugopal and Satheesan in contention. CPI(M) criticizes Congress infighting. After a decade, Congress anticipates forming the government.
Web Summary : केरल में यूडीएफ की जीत के बाद मुख्यमंत्री पद की दौड़ शुरू हो गई है। शशि थरूर ने चुप्पी साध ली है। वेणुगोपाल और सतीशन जैसे नामों पर चर्चा है। सीपीआई (एम) ने कांग्रेस की अंदरूनी कलह की आलोचना की। दस साल बाद, कांग्रेस सरकार बनाने की उम्मीद कर रही है।