Join us
Daily Top 2Weekly Top 5

Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 13:16 IST

Vijay Thalapathy Net Worth: अभिनेते ते राजकारणी बनलेले थलापती विजय, ज्यांचा पक्ष 'तमिळगा वेट्ट्रि कळघम' (TVK) या वर्षीच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येताना दिसत आहे. पक्षाचे प्रमुख आणि अभिनेते थलापति विजय यांचं लक्षरी आयुष्य कसं आहे जाणून घेऊ.

Vijay Thalapathy Net Worth: अभिनेते ते राजकारणी बनलेले थलापती विजय, ज्यांचा पक्ष 'तमिळगा वेट्ट्रि कळघम' (TVK) या वर्षीच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येताना दिसत आहे. अलीकडेच निवडणुकीदरम्यान त्यांनी आपली एकूण संपत्ती ६०० कोटी रुपयांहून अधिक असल्याचं घोषित केलंय. TVK प्रमुख विजय हे पेरंबूर आणि तिरुचिरापल्ली (ट्रिची ईस्ट) या जागांवरून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या नवीन पक्षाची ही पहिलीच निवडणूक आहे.

२०२६ तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी सादर केलेल्या आपल्या प्रतिज्ञापत्रात थलापति विजय यांनी आपली एकूण संपत्ती सुमारे ६०३.२० कोटी रुपये असल्याचं नमूद केलंय. यामुळे ते भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता-राजकारण्यांच्या यादीत सामील झालेत. या संपत्तीमध्ये जंगम आणि स्थावर अशा दोन्ही प्रकारच्या मालमत्तेचा समावेश आहे. त्यांची जंगम मालमत्ता ४०४.५८ कोटी रुपये आणि स्थावर मालमत्ता १९८.६२ कोटी रुपये असल्याचं नमूद करण्यात आलंय.

इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?

यशस्वी चित्रपट कारकीर्द

विजय यांनी ही मोठी संपत्ती त्यांच्या यशस्वी चित्रपट कारकीर्दीतून उभी केली आहे. तीन दशकांहून अधिक काळ ते तमिळ चित्रपटसृष्टीतील मोठे स्टार असून भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्या कमाईचे मुख्य स्त्रोत चित्रपटांचं मानधन, ब्रँड एंडोर्समेंट, रिअल इस्टेटमधील गुंतवणूक आणि इतर वित्तीय गुंतवणूक हे आहेत. वर्ष २०२४-२५ मध्येच त्यांनी १८४.५३ कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर केलं आहे.

बँक बॅलन्स, प्रॉपर्टी आणि लक्झरी लाईफस्टाईल

प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा बँक ठेवींच्या स्वरूपात आहे, जो २१३ कोटी रुपयांहून अधिक आहे. त्यांची गुंतवणूक वेगवेगळ्या खात्यांमध्ये आणि वित्तीय साधनांमध्ये पसरलेली आहे. थलापति विजय यांच्याकडे चेन्नईमध्ये महागडी मालमत्ता, कोडाईकनालमध्ये शेतीसाठी जमीन आणि इतर व्यावसायिक व निवासी मालमत्ता आहेत. तसेच त्यांच्याकडे BMW, Lexus आणि Toyota Vellfire सारख्या आलिशान गाड्याही आहेत.

कुटुंबाची संपत्ती आणि आर्थिक स्थिती

थलापति विजय यांची पत्नी संगीता यांच्याकडेही सुमारे १५.७६ कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. याशिवाय, विजय यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना आणि ट्रस्टना आर्थिक मदत तसंच कर्जही दिलं आहे. त्यांची ही मजबूत आर्थिक स्थिती त्यांच्या वाढत्या राजकीय प्रभावाला अधिक बळकटी देत असून त्यांच्या TVK पक्षाने तामिळनाडूच्या राजकारणात जोरदार सुरुवात केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Thalapathy Vijay: Actor, Politician, and Owner of a ₹600 Crore Empire

Web Summary : Actor-turned-politician Thalapathy Vijay, leading TVK, declared assets exceeding ₹600 crore before elections. He's contesting from Perambur and Tiruchirappalli. Vijay's wealth stems from a successful film career, brand endorsements, and real estate. His wife, Sangeetha, also holds significant assets, bolstering his political influence.
टॅग्स :थलापती विजयनिवडणूक 2026पैसातामिळनाडू