शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 13:31 IST

BJP TMC Workers Clash Bengal : पश्चिम बंगाल निवडणूक निकाल २०२६ दरम्यान आसनसोल, कूचबिहार आणि बांकुरा येथे भाजप-टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये हिंसक चकमक. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा लाठीमार.

आसनसोल: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपला मिळालेल्या मोठ्या आघाडीनंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आसनसोलमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चकमक झाली. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

पश्चिम बंगालमधील २९३ जागांच्या मतमोजणीत भाजपने ऐतिहासिक कामगिरी करत तृणमूल काँग्रेसचा सुपडा साफ केल्याचे चित्र आहे. सध्याच्या कलानुसार भाजप १९२ जागांवर तर तृणमूल काँग्रेस केवळ ९७ जागांवर आघाडीवर आहे. या निकालांमुळे बंगालच्या राजकारणात प्रचंड तणाव निर्माण झाला असून काही ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत. कूचबिहारमध्ये भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये सशस्त्र चकमक झाल्याची माहिती समोर येत आहे. बांकुरा या भागातही दोन्ही पक्षांचे समर्थक आमनेसामने आले असून कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि हाणामारी झाली आहे.

ममता बॅनर्जींचा निवडणूक आयोगावर निशाणासुरुवातीच्या कलानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. "निवडणूक आयोग मनमानी करत आहे, मात्र अंतिम फेरीनंतर आमचाच विजय होईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, कोलकात्यात ममता बॅनर्जी यांच्या 'कालीघाट' येथील निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने जमलेल्या भाजप समर्थकांनी 'जय श्री राम'च्या घोषणा दिल्याने तणाव वाढला आहे.

आसनसोलमध्ये खळबळ: टीएमसी ऑफिसमध्ये तोडफोड आणि बॉम्बमतमोजणी सुरू असतानाच आसनसोलमध्ये टीएमसी कार्यालयावर हल्ला करण्यात आला. आसनसोल इंजिनिअरिंग कॉलेजजवळील मोजणी केंद्राबाहेर दोन गटांत जोरदार चकमक झाली. यावेळी वाहनांची तोडफोड करण्यात आली असून, घटनास्थळी एक जिवंत बॉम्ब आढळल्याने खळबळ उडाली आहे. सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

कुणाल घोष यांचा 'धीराचा' सल्लातृणमूलचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. "आतापर्यंत केवळ ५-६ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत, अजून २० फेऱ्या बाकी आहेत. हा अंतिम निकाल नाही, त्यामुळे आताच भाष्य करणे योग्य ठरणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.

निकालातील महत्त्वाचे मुद्दे:

मत टक्केवारी: भाजपने ४५% मतांसह आघाडी घेतली आहे, तर टीएमसी ४२% वर आहे.

भवानीपूर: ममता बॅनर्जी या स्वतःच्या मतदारसंघात आघाडीवर आहेत, तर सुवेंदू अधिकारी पिछाडीवर आहेत.

मोदी फॅक्टर: झाडग्राम जिल्ह्यातील चारही जागांवर भाजपने पकड मजबूत केली आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक 2026West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसAssembly Election Resultsविधानसभा निवडणूक निकाल २०२६