शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 13:07 IST

इराणने पाकिस्तानमार्गे डोनाल्ड ट्रम्प यांना १४ कलमी शांतता प्रस्ताव पाठवला आहे. काय आहेत इराणच्या अटी आणि ट्रम्प यांनी दिलेला इशारा?

पश्चिम आशियातील युद्धाचा वणवा विझवण्यासाठी इराणने आता एक मोठे राजनैतिक पाऊल उचलले आहे. इराणने पाकिस्तानच्या माध्यमातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे १४ कलमी शांतता प्रस्ताव धाडला आहे. या प्रस्तावाचा मुख्य उद्देश सुरू असलेले युद्ध कायमस्वरूपी थांबवणे हा आहे. मात्र, ट्रम्प यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली असून, "आम्ही विचार करत आहोत, पण इराणसोबत करार होईलच याची खात्री नाही," असे म्हणत सस्पेन्स वाढवला आहे.

काय आहे इराणचा '१४ कलमी' प्लॅन?

इराणचा हा प्रस्ताव अमेरिकेने आधी दिलेल्या ९ कलमी योजनेला प्रत्युत्तर मानले जात आहे. इराणच्या प्रमुख मागण्यांमध्ये पुढील ३० दिवसांत सर्व वाद मिटवून युद्ध कायमस्वरूपी संपवणे, भविष्यात अमेरिकेने इराणवर हल्ला करू नये, याची लेखी हमी, इराणच्या सीमांजवळून अमेरिकन सैन्य मागे घेणे, जप्त केलेली इराणची संपत्ती परत करणे आणि निर्बंध उठवणे, युद्धाच्या नुकसानीची भरपाई आणि लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील युद्धबंदी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, युरेनियम संवर्धनाचा अधिकार अबाधित राखणे, या मागण्या आहेत.

ट्रम्प यांची 'रेड लाईन' आणि होर्मुझचा पेच

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अटींवर स्पष्ट भूमिका घेतली आहे. ट्रम्प यांच्या मते, इराणची परमाणु क्षमता ही अमेरिकेसाठी 'रेड लाईन' आहे. इराणने आपली अण्वस्त्र क्षमता पूर्णपणे सोडावी, अशी अमेरिकेची मागणी आहे. दुसरीकडे, इराणने 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वर केलेली नाकेबंदी मागे घ्यावी, तरच चर्चा पुढे सरकेल, असे ट्रम्प यांनी ठणकावून सांगितले आहे. मात्र, इराण या दोन्ही मुद्द्यांवर माघार घेण्यास तयार नाही.

"चूक केली तर पुन्हा बॉम्ब टाकू!"

फ्लोरिडा येथे पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी आपल्या खास शैलीत इराणला इशारा दिला. ते म्हणाले, "इराण सध्या करार करण्यासाठी हतबल आहे कारण नाकेबंदीमुळे त्यांची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. आम्ही प्रस्तावावर लक्ष ठेवून आहोत, पण जर त्यांनी काहीही वाईट' करण्याचा प्रयत्न केला, तर अमेरिका पुन्हा हल्ले सुरू करण्यास मागे-पुढे पाहणार नाही."

युद्धाची सद्यस्थिती

८ एप्रिलपासून पाकिस्तानच्या मध्यस्थीने युद्धविराम लागू झाला असला तरी परिस्थिती अद्याप तणावपूर्ण आहे. समुद्रात दोन्ही देशांचे नौदल एकमेकांवर हल्ले करत आहेत आणि जहाजे ताब्यात घेण्याचे सत्र सुरूच आहे. आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात असून, ट्रम्प इराणचा हा '१४ कलमी' प्रस्ताव स्वीकारतात की फेटाळतात, यावर जगाचे भवितव्य अवलंबून आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran offers peace plan to Trump via Pakistan: Will war end?

Web Summary : Iran proposed a 14-point peace plan to Trump via Pakistan, seeking a permanent ceasefire, sanctions removal, and uranium enrichment rights. Trump responded cautiously, emphasizing Iran's nuclear capabilities as a 'red line' and demanding the end of naval blockade.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराणWarयुद्ध