शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
2
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
3
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
4
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
5
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
6
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
7
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
8
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
9
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
10
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
11
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
12
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
13
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
14
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
15
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
16
केरळममध्ये भाजपाने खाते उघडले, 'या' मतदारसंघात कमळ फुलले, काँग्रेस, सीपीआयच्या उमेदवारांवर केली मात
17
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
18
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
19
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
20
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
Daily Top 2Weekly Top 5

Baramati Election Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 13:27 IST

Sunetra Pawar Break Ajit Pawar Record: महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांच्या मताधिक्याचा विक्रम मोडला असून बारामती पोटनिवडणुकीत एकतर्फी विजय मिळवला आहे

Baramati By Election Result 2026: बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मताधिक्याचा विक्रम केला आहे. १ लाख ६५ हजार २६६ मतांचा जादुई आकडा पार करून या १९ व्या फेरीअखेर त्यांनी तब्बल १ लाख ६८ हजार ५५५ मते मिळवली आहेत. बारामतीकरांनीसुनेत्रा पवारांना विक्रमी मतांनी निवडून देत राष्ट्रीय पातळीवर नोंद केली आहे. या पोटनिवडणुकीत एकूण ५८.१७ टक्के मतदान झाले आहे. दोन लाख २३ हजार ७०५ बारामतीकरांनी मतदान केले आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे झालेल्या या पोटनिवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार होत्या. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतल्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाहीत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह २३ उमेदवार होते. 

बारामतीतील मताधिक्याचा विक्रम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर होता. २०१९ मध्ये त्यांनी भाजपचे तत्कालीन उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा एक लाख ६५ हजार २६५ मताधिक्याने पराभव केला होता. त्यामुळे आता विक्रम मोडण्यासाठी एक लाख ६५ हजार २६६ हा जादुई आकडा मानला जात होता. अखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या जादुई आकडा पार करून विक्रमी मताधिक्य मिळवले आहे. आज मतमोजणीला सकाळपासून सुनेत्रा पवार यांनी आघाडी घेतली होती. एकूण २४ फेऱ्या पार पडल्या. त्यांच्यासोबत धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे आणि ‘बिग बॉस मराठी’मधील अभिजित बिचुकले आणि इतर २० जणांचा समावेश होता.  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात असलेले २२ उमेदवारांनी मिळून आतापर्यंत ३ हजार ८३०  एवढी मते मिळवली आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sunetra Pawar Achieves Record-Breaking Victory in Baramati By-Election

Web Summary : Sunetra Pawar secured a historic win in Baramati, surpassing Ajit Pawar's record with over 1.68 lakh votes. The by-election saw 58.17% voter turnout. With 23 candidates, Pawar achieved a landslide victory, setting a new benchmark.
टॅग्स :BaramatiबारामतीSunetra Pawarसुनेत्रा पवारAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदानMaharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६