पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून लढत असलेला भारताचा माजी क्रिकेटपटू अशोक दिंडा याने क्रिकेटनंतर आता राजकीय मैदानात दमदार एंट्री घेण्याच्या दिशेने आश्वासक पाऊल टाकले आहे. आज सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये अशोक दिंडा याने मोजना विधानसभा मतदार संघातून आघाडी घेतली आहे.
भारताकडून १३ एकदिवसीय आणि ९ टी-२० सामने खेळणाऱ्या अशोक दिंडाने काही काळापूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केला होता. या विधानसभा निवडणुकीसाठी त्याला भाजपाने मोयना विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. इथे अशोक दिंडासमोर चंदन मोंडल यांचे आव्हान होते. दरम्यान, आज सुरू असलेल्या मतजमोणीमध्ये अशोक दिंडा याने दहा फेऱ्यांअखेर ५५७४ मतांची आघाडी घेतली आहे. आता पुढच्या ७ फेऱ्यांमध्ये आघाडी कायम ठेवून विजय मिळवतो का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या २९३ जागांच्या आज सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये भाजपाने १९५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर तृणमूल काँग्रेस ९२ जागांवर आघाडीवर आहे.
Web Summary : Former cricketer Ashok Dinda, contesting on a BJP ticket, is leading in the Moyna constituency in the West Bengal Assembly elections. After ten rounds, Dinda has a lead of 5574 votes. Early trends show BJP leading on 195 seats, while TMC is ahead on 92.
Web Summary : भाजपा के टिकट पर चुनाव लड़ रहे पूर्व क्रिकेटर अशोक डिंडा पश्चिम बंगाल विधानसभा चुनाव में मोयना निर्वाचन क्षेत्र में आगे चल रहे हैं। दस राउंड के बाद, डिंडा 5574 वोटों से आगे हैं। शुरुआती रुझानों में भाजपा 195 सीटों पर आगे है, जबकि टीएमसी 92 पर आगे है।