शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 16:40 IST

Thalapthy Vijay driver son wins, Tamilnadu Assembly Election 2026: ड्रायव्हरचा मुलगा सबरीनाथन १५ हजारांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने विजयी

Thalapthy Vijay driver son wins, Tamilnadu Assembly Election 2026: तामिळनाडूमध्ये बदलाचे वारे वाहिले आणि अभिनेता थलपती विजय जोसेफचा पक्ष तामिळनाडू वेत्री कळघम (TVK) याने तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला. २३४ पैकी १०४ जागांवर TVKने आघाडी घेत मोठी मुसंडी मारली. तामिळनाडूमध्ये विजयच्या TVK पक्षाची सत्ता येणार हे आता जवळपास निश्चित आहे. या प्रचंड विजयाच्या पार्श्वभूमीवर, एका व्यक्तीचा विजय जास्त चर्चेत आला आहे. थलपती विजयचा दीर्घकाळ ड्रायव्हर असलेले राजेंद्रन यांचा मुलगा सबरीनाथन आर थेट आमदार झाला. त्याला विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले होते. विजयने त्याच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी मंचावर विरुगमपक्कम मतदारसंघातून सबरीनाथनला तिकीट दिले होते. तिकीट वाटपाच्या वेळी शबरीनाथन रडत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मतमोजणीच्या दिवशी त्या शबरीनाथनचे काय झाले? याची चर्चा रंगली होती. त्याचा अखेर निकाल आला असून सबरीनाथनने विजय मिळवल्याचे स्पष्ट झाले.

विजयचा ड्रायव्हर राजेंद्रन यांचा मुलगा सबरीनाथन विरुगमपक्कम मतदारसंघातून निवडणूक लढवत होता. सध्या तो त्याच्या मतदारसंघात १४,००० हून अधिक मतांनी आघाडीवर आहे, त्यामुळे त्याचा विजय निश्चित मानला जात आहे. सबरीनाथनने विजयच्या अपेक्षा पूर्ण केल्या. विजयने त्याच्यावर ठेवलेला विश्वास त्याने सार्थ ठरवला. विजय स्वतः पेरांबूर आणि तिरुची पूर्व या दोन्ही ठिकाणी आघाडीवर आहे. AIDMKचे सरचिटणीस एडप्पाडी के. पलानीस्वामी यांनी एडप्पाडीमध्ये आपली मजबूत आघाडी कायम ठेवली. दरम्यान, DMK अध्यक्ष एम. के. स्टॅलिन कोलाथूरमध्ये पराभूत ठरले. ते २०११ पासून या मतदारसंघात प्रतिनिधित्व करत होते.

तिकीट दिले, त्या दिवशी काय घडले?

विरुगमपक्कममधून सबरीनाथनला पक्षाचा उमेदवार म्हणून घोषित करताच, तो मंचावरच रडू लागला होता. तो लगेच विजयकडे धावत गेला होता आणि त्याला मिठी मारली होती व मग त्याच्या पाया पडला होता. या प्रसंगी स्वत: ड्रायव्हर राजेंद्रनदेखील भावनिक झाले होते. विजयने यावेळी त्यांचे आनंदाश्रू पुसले होते. या संवादाचे व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल होत झाले होते. समर्थकांनी याला त्यांच्या निष्ठेचा आणि दीर्घकाळच्या वैयक्तिक संबंधांची पावती म्हटले होते.

पहिल्या चित्रपटापासून विजयसोबत...

राजेंद्रन हे तीन दशकांहून अधिक काळ विजयसोबत आहेत. सुरुवातीला ते त्यांचे ड्रायव्हर म्हणून आणि नंतर त्यांचे स्वीय्य सहाय्यक (PA) म्हणून काम करत होते. विजयच्या फॅन नेटवर्कशी संबंधित स्थानिक कल्याणकारी उपक्रमांमध्ये सक्रिय असलेल्या सबरीनाथन याची गेल्या वर्षी विरुगंबक्कमचे जिल्हा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. निवडणुकीचे तिकीट मिळण्यापूर्वी तो संघटनेत हळूहळू वरच्या पदावर पोहोचला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Thalapathy Vijay's driver's son becomes MLA, wept upon ticket!

Web Summary : Thalapathy Vijay's party TVK won big in Tamil Nadu elections. Notably, his driver's son, Sabarinathan, became an MLA from Virugambakkam. Sabarinathan, overwhelmed when Vijay granted him the ticket, secured a victory, fulfilling Vijay's trust. He was ahead by 14,000 votes.
टॅग्स :TamilnaduतामिळनाडूElectionनिवडणूक 2026Thalapathy Vijayथलापती विजयAssembly Electionविधानसभा निवडणूक २०२६