शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
5
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
6
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
7
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
8
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
9
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
10
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
11
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
12
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
13
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
14
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
15
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
16
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
17
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
18
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
19
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
20
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
Daily Top 2Weekly Top 5

पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 17:44 IST

उत्तराखंडच्या काशीपूरमध्ये पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला दारूत विष देऊन मारले. प्रियकरासाठी १० वर्षांचे नाते संपवून केले क्रूर कृत्य.

अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी एका पत्नीने क्रूरतेची सीमा ओलांडल्याची घटना उत्तराखंडच्या काशीपूरमध्ये उघडकीस आली आहे. १० वर्षांचा सुखाचा संसार मोडून एका वर्षाच्या प्रेमासाठी पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीला विष देऊन संपवले. धक्कादायक म्हणजे, हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह महामार्गावरील एका कालव्यात फेकून दिला. पोलिसांनी ८ दिवसांनंतर मृतदेह शोधून काढत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

पार्टीचा बनाव आणि खुनाची योजना

मृत कुलवंत सिंह (३२) हा २५ एप्रिल रोजी पत्नी गुड्डीला भेटण्यासाठी तिच्या फ्लॅटवर गेला होता. गुड्डीने आधीच आपला प्रियकर कपिल मौर्य याच्यासोबत मिळून कुलवंतच्या हत्येचा कट रचला होता. फ्लॅटवर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. तिथे गुड्डीने दारू आणि बिअर मागवून ठेवली होती. कुलवंत नशेत असताना, संधी साधून गुड्डी आणि कपिलने त्याच्या दारूमध्ये गुपचूप सल्फासच्या गोळ्या मिसळल्या. विषारी दारू पिताच कुलवंतचा तिथेच तडफडून मृत्यू झाला.

असा विल्हेवाट लावला मृतदेहाचा

पतीचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर गुड्डी आणि कपिलने त्याचा मृतदेह कारमध्ये टाकला आणि महामार्गावरील बायपास पुलाजवळ असलेल्या एका कालव्यात फेकून दिला. कुलवंत घरी न परतल्याने त्याच्या आईने १ मे रोजी पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. कुलवंत २५ एप्रिलला पत्नीला भेटायला गेला होता, ही एकमेव माहिती पोलिसांच्या हाती होती.

अवैध संबंधातून घात

तपास सुरू असताना पोलिसांना गुड्डी आणि कपिल मौर्य यांच्यातील अवैध संबंधांची कुणकुण लागली. संशयाच्या आधारे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कडक चौकशी केली असता, गुड्डीने आपला गुन्हा कबूल केला. "पती नशेत मला मारहाण करायचा, त्यामुळे आम्ही त्याला संपवले," असे तिने पोलिसांना सांगितले. या दोघांच्या प्रेमप्रकरणाची माहिती कुलवंतला मिळाली होती आणि त्यावरून त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. याच रागातून कुलवंतची हत्या करण्यात आली. पोलिसांनी एसडीआरएफच्या मदतीने ८ दिवसांनंतर कालव्यातून कुलवंतचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून न्यायालयाने दोन्ही आरोपींची रवानगी तुरुंगात केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Wife poisons husband at party, flees with lover; crime revealed.

Web Summary : In Kashipur, a wife and her lover murdered her husband with poisoned alcohol at a party. They dumped the body in a canal. Police discovered the crime eight days later after a missing person report was filed by the victim's mother. Both suspects are in custody.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttarakhandउत्तराखंडhusband and wifeपती- जोडीदारDeathमृत्यू