शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 18:33 IST

Congress Harshwardhan Sapkal: केरळचा विजय ऊर्जा देणारा असून, ही ऊर्जाच काँग्रेसला आगामी काळात बळ देणारी ठरेल, असा विश्वास हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.

Congress Harshwardhan Sapkal: पाच राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने साम, दाम, दंड, भेद नितीचा वापर केला पण दक्षिण भारतातील जनतेने भाजपाच्या विषारी, विखारी व देश तोडणारा विचार व नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वही नाकारले आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये मोदी सरकारने निवडणूक आयोगाच्या मदतीने सर्व मर्यादा, परंपरा, नियम यांना धाब्यावर बसवले. एनआयए, सीआरपीएफ, एन्काउटर स्पेशालिस्ट अधिकारी पश्चिम बंगालमध्ये पाठवून दडपशाहीचा वापर केला. पुन्हा एकदा भाजपाने गैरप्रकार करून पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवला आहे पण भाजपाची ही विषारी ताकद दक्षिण भारतात मात्र चालली नाही व मोदींचे नेतृत्वही चालले नाही.  

केरळचा विजय काँग्रेसला देशभर ऊर्जा देणारा

केरळमध्ये काँग्रेस पक्षाचा विजय हा लोकशाही व संविधानाचा असून काँग्रेस पक्षाचा विचार व राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर केरळच्या जनतेने विश्वास व्यक्त केला आहे. देशाला काँग्रेसचा विचारच तारणारा असून केरळच्या विजयाने काँग्रेसच्या देशभरातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे, ही ऊर्जाच काँग्रेसला आगामी काळात बळ देणारी ठरेल, असा विश्वास हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ आघाडीने दणदणीत विजय मिळवत दहा वर्षांनंतर राज्याच्या सत्तेत पुनरागमन केले आहे. केरळमध्ये अद्याप किरकोळ अस्तित्व भाजपाने आपल्या कामगिरीत सुधारणा करत खाते उघडले आहे. राज्यातील चथन्नूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार बी.बी. गोपाकुमार हे विजयी झाले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला केरळमध्ये भोपळाही फोडता आला नव्हता. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Kerala's Wise Voters Support Congress, Rahul Gandhi: Harshvardhan Sapkal

Web Summary : Harshvardhan Sapkal stated that Kerala's victory empowers Congress nationwide. He criticized BJP's tactics in other states, emphasizing Kerala's faith in Congress's ideology and Rahul Gandhi's leadership. UDF's win in Kerala boosts Congress's morale.
टॅग्स :Kerala Assembly Election 2026केरळ विधानसभा निवडणूक २०२६congressकाँग्रेसHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळRahul Gandhiराहुल गांधीAssembly Electionविधानसभा निवडणूक २०२६