शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 18:15 IST

नेपाळच्या बालेन शाह सरकारने लिपुलेख मार्गावरून होणाऱ्या कैलास मानसरोवर यात्रेला विरोध केला आहे.

कैलास मानसरोवर यात्रेसाठी भारत आणि चीनने लिपुलेख आणि नथुला मार्गाचा वापर करण्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर नेपाळने आता वादग्रस्त पाऊल उचलले आहे. नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्या सरकारने अधिकृतपणे भारत आणि चीनसमोर आपला निषेध नोंदवला आहे. लिपुलेख हे नेपाळचे क्षेत्र असल्याचा दावा करत, तिथे कोणत्याही प्रकारच्या रस्ते बांधणीला, व्यापाराला किंवा तीर्थयात्रेला आमचा विरोध आहे, असे नेपाळने म्हटले आहे.

काय आहे नेपाळचे म्हणणे?

नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने ६ मुद्द्यांचे एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, लिपुलेख हा नेपाळचा अविभाज्य भाग आहे. भारत आणि चीनने या मार्गावरून यात्रा सुरू करण्याची केलेली घोषणा नेपाळला मान्य नाही. विशेष म्हणजे नेपाळने या पत्रात चीनला 'मित्र देश' म्हणून संबोधित केले असले तरी, त्यांच्या निर्णयाला मात्र कूटनीतिक माध्यमातून विरोध दर्शवला आहे. बालेन शाह सरकारने या प्रकरणी के.पी. शर्मा ओली यांच्या सरकारचाच जुना आक्रमक पवित्रा कायम ठेवल्याचे दिसत आहे.

भारत-चीनचा प्लॅन काय होता?

दोन दिवसांपूर्वीच भारत आणि चीनने कैलास मानसरोवर यात्रेचे नियोजन जाहीर केले होते. यानुसार एकूण १,००० भाविकांना यात्रेला पाठवले जाणार होते. त्यापैकी ५०० भाविक लिपुलेख खिंडीतून (उत्तराखंड) आणि ५०० भाविक सिक्कीममधील नथुला खिंडीतून जाणार होते. नेपाळमध्ये ही बातमी पसरताच बालेन शाह सरकारच्या शांततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले, त्यानंतर सरकारने हे निषेध पत्र पाठवले.

लिपुलेखचा वाद नेमका काय?

भारत आणि नेपाळमधील हा सीमावाद १८१६ च्या 'सुगौली संधी'शी संबंधित आहे. यावर नेपाळने असा दावा केला की, महाकाली नदीचा उगम लिम्पियाधुरामध्ये आहे, त्यामुळे लिपुलेख आणि कालापानी हे भाग नेपाळचे आहेत. भारताने आपली भूमिका मांडताना म्हटले की, महाकाली नदीचा उगम पूर्वेकडील लिपुखोलाजवळ आहे, त्यामुळे हे भाग भारताचे आहेत. २०२० मध्ये जेव्हा भारताने लिपुलेखपर्यंत रस्ता बांधला, तेव्हा तत्कालीन ओली सरकारने नेपाळचा नवीन नकाशा जारी करून हे भाग स्वतःचे असल्याचे दाखवले होते. आता बालेन शाह सरकारनेही त्याच वादाला पुन्हा फोडणी दिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nepal objects to Kailash Mansarovar Yatra via Lipulekh; protests to India, China.

Web Summary : Nepal protests India and China's Kailash Mansarovar Yatra plans via Lipulekh, claiming it as their territory. They assert Lipulekh's inclusion in Nepal per the 1816 treaty, reigniting border disputes.
टॅग्स :NepalनेपाळIndiaभारतchinaचीन