शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
5
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
6
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
7
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
8
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
9
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
10
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
11
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
12
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
14
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
15
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
16
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
17
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
18
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
19
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
20
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
Daily Top 2Weekly Top 5

निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 19:35 IST

West Bengal Assembly Election 2026 Result: पश्चिम बंगालमध्ये भाजपाला यश मिळत आहे, असे दिसताच पंतप्रधान मोदी यांना झालमुडी दिलेल्या विक्रेत्याने दिवसभर बंद ठेवलेले दुकान उघडले आणि प्रतिक्रियाही दिली.

West Bengal Assembly Election 2026 Result: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. २९३ जागांपैकी एकूण २०४ जागांवर भाजपा आघाडीवर असून, ६६ जागी भाजपा उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष एकूण ५३ जागांवर आघाडीवर असून, ३० जागांवर तृणमूलचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेस पक्ष २ जागांवर आघाडीवर असून, एक जागा जिंकली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून, देशभरात विजयोत्सव साजरा केला जात आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या दुकानात झालमुडी घेतली होती, त्या विक्रेत्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी झालमुडीचा आस्वाद घेतला. पंतप्रधान मोदींचा झालमुडी विकत घेतानाचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. यानंतर देशभरात या घटनेची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. भाजपाच्या पश्चिम बंगालमधील विजयाच्या निर्णायक मुद्द्यांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी झालमुडी विक्रेत्याच्या दुकानाला दिलेली भेट आणि आपलेपणाने साधलेला संवाद हाही एक मुद्दा मानला जात आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाने विजयश्री खेचून आणताच त्या झालमुडी विक्रेत्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले

पश्चिम बंगालमधील झारग्राम येथे काही दिवसांपूर्वी एका रॅलीहून परतत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी येथील एका झालमुडी विक्रेत्याच्या दुकानात थांबले होते. त्यांनी या झालमुडीचा आस्वाद घेतला होता. निवडणुकीच्या निकालांबाबत असलेल्या अनिश्चिततेमुळे दुकानदार विक्रम कुमार साऊ यांनी दिवसभर आपले दुकान बंद ठेवले होते; मात्र भाजपच्या विजयानंतर सायंकाळी त्यांनी ते पुन्हा उघडले. या दुकानाबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. तसेच या दुकानासमोर भारत माता की जय, जय श्रीराम अशा घोषणाही दिल्या. भाजपाच्या यशाबाबत प्रतिक्रिया देताना दुकानदार विक्रम कुमार साऊ म्हणाला की, खूपच छान वाटले. केवळ माझे दुकानच प्रसिद्ध झाले नाही, तर 'झालमुरी'ला एक खाद्यपदार्थ म्हणून संपूर्ण भारतात ओळख मिळाली आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर विक्रम साह यांनी या अनुभवाबाबत सांगितले. पंतप्रधान मोदी यांना झालमुडी खूपच आवडली. त्यांनी माझे नाव विचारले आणि किती शिक्षण घेतले आहे, हेही विचारले. पंतप्रधान मोदी येथे १० मिनिटे थांबले होते. त्यांच्यासोबत लहान मुलेही होती. पंतप्रधान माझ्या दुकानात येतील, असे वाटले नव्हते. पुढे हसून विक्रम यांनी म्हटले होते की, एका गोष्टीची खंत आहे, ती म्हणजे, मी पंतप्रधानांची स्वाक्षरी घ्यायला विसरलो. हा क्षण मी आयुष्यभर लक्षात ठेवेल. देशाचे पंतप्रधान माझ्या छोट्याशा दुकानात आले याचा मला खूप आनंद झाला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Nervous Wait Over, Shop Reopens After BJP Win: Jhalmuri Seller Speaks

Web Summary : West Bengal's election saw BJP surge ahead. A Jhalmuri seller, visited by Modi, kept his shop closed due to election jitters. Upon BJP's victory, he reopened, expressing joy that his shop and Jhalmuri gained recognition.
टॅग्स :West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Assembly Electionविधानसभा निवडणूक २०२६Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा