शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
2
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
7
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
11
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
12
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
13
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
14
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
15
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
16
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
17
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
18
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
19
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 20:24 IST

Baramati Bypoll Election 2026 Result: बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात २२ जणांनी अर्ज दाखल केले होते. सर्वात कमी मते कोणाला मिळाली?

Baramati Bypoll Election 2026 Result:बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी तब्बल २ लाख १८ हजार ९३० मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवत राजकीय वर्तुळात नवा इतिहास घडवला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या या पोटनिवडणुकीत बारामतीच्या मतदारांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबावर विश्वास दाखवला. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीने प्रयत्न केले होते. परंतु, तसे होऊ शकले नाही. अखेर मतदारांनी मतदान पेटीतून उत्तर दिले.

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात २२ जणांनी अर्ज दाखल केले. यामध्ये काँग्रेस आणि इतर प्रमुख पक्षांनी येथे उमेदवार दिला नसला तरी, स्थानिकांसह बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले आणि करुणा शर्मा-मुंडे यांनी उमेदवारी दाखल केले होते. बारामतीच्या पोटनिवडणुकीत २४ व्या फेरी अखेर सुनेत्रा पवारांना २ लाख १८ हजार ९३० इतकी मते मिळाली आहेत. उत्तर प्रदेशच्या साहिबाबादमधील सुनील कुमार शर्मा यांचा रेकॉर्ड सुनेत्रा पवारांनी मोडला आहे. २०२२ च्या निवडणुकीत सुनील कुमार शर्मांना २ लाख १४ हजार ८३५ मते मिळाली होती. तब्बल २ लाख मताधिक्याचा विक्रमी टप्पा पार करत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी एकतर्फी विजय मिळवला.

अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत

अभिजीत बिचुकले यांना बारामती विधानसभा निवडणुकीत अवघे ३३३ मते मिळाली असून ते ५ व्या क्रमांकावर राहिले. तर, करुणा शर्मा यांना ३०१ मते मिळाली असून, त्या सहाव्या स्थानी राहिल्या. विशेष म्हणजे या दोन्ही उमेदवारांपेक्षा NOTA या पर्यायाल अधिक मते मिळाली. बारामती मतदारसंघात NOTA पर्यायाला ७७४ मते मिळाली. तर, सुनेत्रा पवार यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर प्रोफेसर आर. व्हाय. घुतुकडे सर यांना अवघी ९३५ मते मिळाली. तसेच अपक्ष उमेदवार चंद्रकांत मोटे हे ४२ मतांसह सर्वात कमी मत घेणारे उमेदवार ठरले.

दरम्यान, मी माझा अर्ज मागे घेतला नाही. माझ्यावर माघारी घेण्याचा शिक्का नको होता. माझे डिपॉझिट जप्त झाले असले तरी, हे माझे कष्टाचे पैसे आहेत. मी कुणाकडून आणत नाही. माझी प्रगती हळूहळू होत आहे. माझे स्वप्न आमदार होण्याचे नाही, मी किंग होण्यासाठी लढतो आहे. मी आमदार नाही किंगमेकर होणार आहे. मी बारामतीत प्रचार केला असता, तर निकाल निश्चितच वेगळा लागला असता. मात्र, अजित पवार यांना आदरांजली म्हणून त्या ठिकाणी गेलो नाही, अशी प्रतिक्रिया अभिजित बिचुकले यांनी दिली.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Baramati Bypoll: Bichukale, Karuna Munde Defeated by NOTA; Results Revealed

Web Summary : Sunetra Pawar won Baramati by-election with a record margin. Bichukale and Karuna Munde received fewer votes than NOTA. Pawar secured 2,18,930 votes.
टॅग्स :Baramatiबारामतीbaramati-pcबारामतीSunetra Pawarसुनेत्रा पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसabhijeet bichukaleअभिजीत बिचुकलेPoliticsराजकारण