indian flag underwater world record in andaman: भारताच्या शौर्याची आणि साहसाची प्रचिती देणारी एक अद्भूत घटना अंदमानमध्ये घडली. समुद्राच्या खोल तळाशी भारतीय राष्ट्रध्वज फडकवून एक नवा जागतिक विक्रम नोंदवण्यात आला.
खोल समुद्रात फडकवला तिरंगा, गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंद
अंदमान स्वच्छ निळ्याशार समुद्रात हा विक्रम करण्यासाठी तज्ज्ञ डायव्हर्सच्या (Divers) एका चमूने अनेक फूट खोल तळाशी जाऊन तिरंगा फडकवला. पाण्याखालील तीव्र प्रवाहाचा सामना करत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हे ध्वजारोहण पार पडले. या मोहिमेची दखल घेत 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स'च्या अधिकृत चमूने याला जगातील सर्वात मोठे 'अंडरवॉटर' ध्वजारोहण म्हणून मान्यता दिली आहे.
"स्वराज द्वीपावर भारताचा सर्वात मोठा अंडरवॉटर तिरंगा (६०x४० मीटर) अभिमानाने फडकला. तब्बल २०० गोताखोरांच्या सहभागातून हा अद्वितीय पराक्रम साकारत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद करण्यात आली आहे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताच्या धैर्य, एकता आणि समुद्री क्षमतेचा भव्य आविष्कार आहे. अंदमान-निकोबारला जागतिक डाइविंग हॉटस्पॉट बनवण्याच्या दिशेने हे एक मोठे आणि प्रेरणादायी पाऊल आहे. देशाचा तिरंगा जिथे असेल, तिथे अभिमानाची पताका उंचावत राहील," असे याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट केले.
साहस आणि देशभक्तीचे दर्शन
व्हिडिओमध्ये दिसते की, डायव्हर्सने पाण्याखाली केवळ तिरंगाच फडकवला नाही, तर राष्ट्रगीत गात मानवंदनाही दिली. निळ्याशार समुद्रात फडकणारा भगवा, पांढरा आणि हिरवा रंग एक विलोभनीय दृश्य निर्माण करत होता. हा व्हिडिओ इंटरनेटवर येताच 'व्हिजनरी इंडिया' आणि 'प्राउड इंडियन' अशा हॅशटॅगसह व्हायरल झाला. अनेकांनी याला भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाचे प्रतीक म्हटले. अंदमान आणि निकोबार बेटे ही भारताच्या सागरी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. अशा ठिकाणी जागतिक विक्रम प्रस्थापित केल्यामुळे पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.
Web Summary : In Andaman, divers hoisted the Indian flag underwater, setting a Guinness World Record. The 60x40 meter tricolor flew proudly at Swaraj Island, a feat involving 200 divers. This showcases India's courage and maritime capabilities, boosting tourism and security.
Web Summary : अंडमान में, गोताखोरों ने पानी के नीचे भारतीय ध्वज फहराकर गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड बनाया। स्वराज द्वीप पर 60x40 मीटर का तिरंगा गर्व से फहराया गया, जिसमें 200 गोताखोर शामिल थे। यह भारत के साहस और समुद्री क्षमताओं को दर्शाता है, पर्यटन और सुरक्षा को बढ़ावा देता है।