शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 19:32 IST

1 / 6
काही लोकांना समुद्रकिनारे आवडतात, तर काहींना डोंगरदऱ्या. पण काही पर्यटक इतके क्रिएटिव्ह असतात की ते अक्षरांच्या क्रमाने देश फिरण्याचे नियोजन करतात. 'D' अक्षरावरून सुरू होणाऱ्या देशांची संख्या जरी कमी असली, तरी तिथले सौंदर्य मात्र अफाट आहे.
2 / 6
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो : आफ्रिकेतील हा दुसरा सर्वात मोठा देश आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती आणि हिऱ्यांच्या खाणींसाठी हा देश ओळखला जातो. जरी इथे राजकीय अस्थिरता असली, तरी इथली घनदाट जंगले आणि वन्यजीव पर्यटकांना आकर्षित करतात. इथले विरुंगा नॅशनल पार्क, न्यिरागोंगो ज्वालामुखी आणि काहुजी बिएगा नॅशनल पार्क ही ठिकाणे बघायला हवीत.
3 / 6
जिबूती : आफ्रिका खंडातील हा एक छोटासा देश तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला आहे. इथे तुम्हाला अरबी आणि आफ्रिकन संस्कृतीचा एक अनोखा मिलाफ पाहायला मिळेल. इथली किनारपट्टी पर्यटकांना भुरळ घालते. या देशात जगातील सर्वात खारट तलावांपैकी एक असलेले 'लेक असाल', लेक अब्बे आणि डे फॉरेस्ट नॅशनल पार्क ही ठिकाणी पाहाण्यासारखी आहेत.
4 / 6
डॉमिनिकन रिपब्लिक : डॉमिनिकन रिपब्लिक हा देश हैतीसोबत 'हिस्पानिओला' हे बेट शेअर करतो. पांढऱ्या शुभ्र वाळूचे समुद्रकिनारे आणि रंगीबेरंगी संस्कृतीसाठी हा देश जगप्रसिद्ध आहे. याची राजधानी सँटो डोमिंगो ही जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक मानली जाते. या देशातील पुंटा कानाचे किनारे, सँटो डोमिंगो झोन आणि साओना आयलंड ही ठिकाणे पाहाण्यासारखी आहेत.
5 / 6
डॉमिनिका : कॅरिबियन समुद्रातील हा एक छोटेसे पण अतिशय सुंदर बेट आहे. याला 'कॅरिबियनचे निसर्ग बेट' म्हटले जाते. इथे तुम्हाला ज्वालामुखी, वर्षावने आणि धबधब्यांचा विलोभनीय संगम पाहायला मिळेल. या देशात फिरायला येत असाल तर, बॉइलिंग लेक, मोर्ने ट्रोइस पिटोंस नॅशनल पार्क आणि ट्राफलगर धबधबा नक्की बघा.
6 / 6
डेन्मार्क : स्कॅन्डिनेव्हियन देशांपैकी एक असलेला डेन्मार्क हा त्याच्या समृद्ध इतिहासासाठी आणि उत्तम जीवनशैलीसाठी ओळखला जातो. प्रसिद्ध लेखक हँस ख्रिश्चन अँडरसन यांच्या परीकथांचा उगम याच देशात झाला. या देशाची राजधानी कोपनहेगनमधील रंगीबेरंगी 'नयहावन' बंदर, टिवोली गार्डन्स आणि 'द लिटिल मरमेड' हा पुतळा पाहण्यासारखा आहे.
टॅग्स :tourismपर्यटनTravel Tipsट्रॅव्हल टिप्स