शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
3
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
4
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
5
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
6
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
7
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
8
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
9
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
10
Suvendu Adhikari : "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले
11
पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... 
12
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
13
Vijay's TVK: अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
14
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
15
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
16
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
17
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
18
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
19
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
20
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
Daily Top 2Weekly Top 5

"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 11:11 IST

West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगाल निवडणूक निकालाच्या तिसऱ्या फेरीनंतर सुवेंदू अधिकारी ९०० मतांनी पिछाडीवर आहेत. मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना त्यांनी विजयाचा मोठा दावा केला आहे.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भवानीपूर आणि नंदीग्राम या दोन्ही जागांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीअखेर भवानीपूरमधून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुवेंदू अधिकारी यांच्यावर ९०० मतांची आघाडी घेतली आहे. या सुरुवातीच्या पिछाडीनंतर सुवेंदू अधिकारी मतमोजणी केंद्रातून बाहेर पडले असून त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

जातीय समीकरणांवर सुवेंदू अधिकारींचे भाष्यमतमोजणीच्या फेऱ्यांवर भाष्य करताना सुवेंदू अधिकारी म्हणाले की, "पहिल्या फेरीत मुस्लिम बहुल मतदार जास्त होते, त्यामुळे ममता बॅनर्जींना आघाडी मिळाली. दुसऱ्या फेरीत हिंदू मतदारांचे प्राबल्य होते, तेव्हा मी २००० मतांनी पुढे आलो होतो. आता तिसऱ्या फेरीत त्या पुन्हा काही मतांनी पुढे आहेत."

"पुढचे काही राऊंड 'दीदी'साठी, पण शेवट माझाच"अधिकारी यांनी विजयाचे गणित मांडताना सांगितले की, "पुढच्या साधारण ७ ते ८ फेऱ्यांमध्ये ममता बॅनर्जी आघाडीवर राहतील, हे मला आधीच माहित आहे. कारण ते भाग त्यांचे बालेकिल्ले आहेत. मात्र, त्या फेऱ्या संपल्यानंतर मी पुन्हा एकदा मुसंडी मारेन आणि अखेर मीच मोठ्या फरकाने विजय मिळवून दाखवेन."

राजकीय वर्तुळात चर्चामतमोजणी सुरू असतानाच सुवेंदू अधिकारी केंद्रातून बाहेर पडल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मात्र, त्यांनी दिलेला हा दावा भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी आहे की त्यांच्याकडे खरोखरच विजयाचे तगडे समीकरण आहे, हे येत्या काही तासांत स्पष्ट होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Suvendu Adhikari predicts Mamata Banerjee's lead, claims ultimate victory.

Web Summary : Despite Mamata Banerjee's initial lead in Bhawanipur, Suvendu Adhikari confidently predicts victory. He acknowledges Banerjee's strength in certain rounds due to voter demographics but anticipates surpassing her later. Adhikari's early exit from counting sparked speculation, his claim aims to boost BJP morale.
टॅग्स :west bengalपश्चिम बंगालWest Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Assembly Electionविधानसभा निवडणूक २०२६Electionनिवडणूक 2026