Assembly Election Results 2026 Live Updates Marathi: चार राज्यांसह एका केंद्र शासित प्रदेशामध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेषतः पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळात सत्तांतर होण्याचे संकेत मिळत आहेत. निवडणूक आयोगाने सुरुवातीच्या मतमोजणी फेऱ्या पूर्ण पडल्यानंतर कलांचे आकडे जाहीर केले आहेत. यात तीन पश्चिम बंगालमध्ये भाजपा, तर तामिळनाडूमध्ये टीव्हीकेने मुसंडी मारली आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपा?
सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला झटका बसण्याचे संकेत मिळत आहेत. दहा वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीच्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपाने आघाडी घेतली आहे. भाजपा ४६ जागांवर, तृणमूल काँग्रेस २४ जागा, तर बीजीपीएम आणि एजेयूपी प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी १४७ जागा आवश्यक आहेत.
तामिळनाडूत विजयच्या टीव्हीकेची जादू
दक्षिणेतील एक महत्त्वाचे राज्य असलेल्या तामिळनाडूमध्ये अभिनेता विजयच्या टीव्हीएमके पक्षाने मोठी मुसंडी मारली आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, टीव्हीके ७१ जागांवर आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ अण्णाद्रमुक ५२, तर द्रमुक २९ जागांवर आघाडीवर आहे. पीएमके ३ जागा आणि काँग्रेसने ५ जागांवर आघाडी घेतली आहे. तामिळनाडूमध्ये बहुमताचा आकडा ११८ असून, या कलानुसार तामिळनाडूमध्येही सत्तांतराची चिन्हे दिसत आहेत.
केरळात काँग्रेस सत्तेत येणार?
संयुक्त लोकशाही आघाडी आणि डावी लोकशाही आघाडी या दोन गटांमध्येच थेट लढत होत असलेल्या केरळमध्ये सत्तांतर होताना दिसत आहे. केरळमध्ये काँग्रेसने ५२ जागांवर आघाडी घेतली आहे. तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) ३१ जागांवर आघाडीवर आहे. आययूएमएल २० जागांवर, सीपीआय १३ जागा, तर केईसी ५ जागांवर आघाडीवर आहे. केरळात बहुमतासाठी ७१ जागा आवश्यक आहेत.
आसामध्ये भाजपा सत्ता राखणार?
आसाममध्ये यावेळी सत्तांतर होणार का? याकडे लक्ष होते; पण सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा सत्ता राखणार असल्याचे दिसत आहे. भाजपाने ६८ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसने २० जागांवर, तर बीओपीई ८, आसाम गण परिषद ७ जागांवर आघाडीवर आहे. आसाममध्ये बहुमताचा आकडा ६४ इतका आहे.
पद्दुचेरीमध्ये कोणाला सत्ता?
एआयएनआरसी पक्षाने ८ जागांवर आघाडी घेतली असून, आयएनडी ३ जागा, काँग्रेस २ जागा, तर भाजपाआणि अण्णाद्रमुक प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत. इथे भाजपा प्रणित आघाडीलाच सत्ता मिळताना दिसत आहे. पद्दुचेरीमध्ये बहुमताचा आकडा १६ इतका आहे.
Web Summary : Early election results indicate potential power shifts in West Bengal, Tamil Nadu, and Kerala. BJP leads in Assam, while Puducherry favors BJP alliance. Close contests unfold.
Web Summary : शुरुआती रुझानों में पश्चिम बंगाल, तमिलनाडु और केरल में सत्ता परिवर्तन के संकेत। असम में भाजपा आगे, पुडुचेरी में भाजपा गठबंधन को बढ़त। कांटे की टक्कर जारी।