शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
3
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
4
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
5
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
6
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
7
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
8
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
9
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
10
Suvendu Adhikari : "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले
11
पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... 
12
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
13
Vijay's TVK: अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
14
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
15
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
16
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
17
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
18
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
19
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
20
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
Daily Top 2Weekly Top 5

Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 11:56 IST

Assembly Election Results 2026 Marathi: चार राज्यांपैकी तीन राज्यांमध्ये मतदारांनी सत्तांतराला कौल दिला आहे. ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा मोठा धक्का असून, तामिळनाडूतही स्टॅलिन यांच्या पक्षाचा मोठा पराभव झाला आहे. 

Election Results 2026 Latest Update: चार राज्ये आणि एका केंद्र शासित प्रदेशांत कोणाची सत्ता असणार, याबद्दलचे चित्र आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. महत्त्वाचे म्हणजे देशाचे लक्ष असलेल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमध्ये जनतेने सत्तांतर घडवले आहे. यात पश्चिम बंगालमध्ये भाजपा, तामिळनाडूत विजयच्या केव्हीके आणि केरळात काँग्रेसला जनादेशाचा कौल मिळताना दिसत आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, तीन मोठ्या राज्यात सत्तांतर होताना दिसत असून, आसाममध्ये भाजपाने, तर पुद्दुचेरीमध्ये भाजपा आघाडीने पुन्हा सत्ता कायम राखण्यात यश मिळवले आहे. ११.३० पर्यंत झालेल्या मतमोजणीच्या फेऱ्यानंतर निवडणूक आयोगाने आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

पश्चिम बंगालमध्ये अखेर भाजपाचे कमळ फुले

चार राज्यांपैकी सर्वाधिक लक्ष होते पश्चिम बंगालकडे. पश्चिम बंगालची सत्ता मिळवण्यात भाजपाला यश आले आहे. ११.३० पर्यंतच्या मतमोजणीनंतर भाजपाने तब्बल १५६ जागांवर आघाडी घेतली आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. 

तृणमूल काँग्रेस ८४ जागांवर आघाडीवर असून, बीजीपीएम, एजेयूपी आणि सीपीआय(एम) यांनी प्रत्येकी एका जागेवर आघाडी घेतलेली आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेसाठी १४७ बहुमताचा आकडा आहे. भाजपाने आतापर्यंत १५६ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे ममतांना सत्तेवरून खाली खेचण्यात भाजपाला यश आल्याचे दिसत आहे. 

तामिळनाडूमध्ये टीव्हीकेचा 'विजय' 

सगळ्यात जास्त धक्कादायक निकाल तामिळनाडूमध्ये लागताना दिसत आहे. अभियनातून निवृत्ती घेऊन राजकारणात उतरलेल्या विजय यांच्या टीव्हीके पक्षाला जनतेने जनादेश दिल्याचे कलांमधून दिसत आहे. तामिळनाडून बहुमतासाठी ११८ जागा आवश्यक आहेत. टीव्हीकेने ११.३०पर्यंतच्या निकालानुसार १०८ जागांवर आघाडी घेतली आहे. 

सत्तेत असलेली द्रमुक तिसऱ्या स्थानी फेकली गेली असून, अवघ्या ४१ जागांवर आघाडीवर आहे. तर अण्णाद्रमुक ६३ जागांवर आघाडीवर आहे. पीएमके ६ जागांवर, काँग्रेस ५ जागांवर आघाडीवर आहे. विजय यांच्या टीव्हीकेने स्टॅलिनच्या यांच्या द्रमुकला सत्तेतून खाली खेचण्यात यश मिळवले असून, हा मोठा धक्का त्यांच्यासाठी आहे. 

केरळात डाव्यांचा किल्ला ढासळला

सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवण्यात यशस्वी ठरलेल्या डाव्या लोकशाही आघाडीला यावेळी जनतेने विरोधी बाकांवर बसवले आहे. केरळात काँग्रेसने ५६ जागांवर आघाडी घेतली असून, सीपीआय(एम) पक्ष ३० जागांवर आघाडीवर आहे. आययूएमएल २३ जागा, सीपीआय ११, तर केईसी ७ जागांवर आघाडीवर आहे. 

आसाममध्ये काँग्रेसची निराशा

आसाममध्ये सत्तांतर होण्याची अपेक्षा काँग्रेसला होती, पण मतदारांनी पुन्हा भाजपाला संधी दिल्याचे दिसत आहे. बहुमतासाठी ६४ जागा लागणाऱ्या आसाममध्ये भाजपाने ७९ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस २५ जागांवर आघाडीवर असून, त्यानंतर इतर प्रादेशिक पक्षांचा क्रमांक लागतो. त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षाचीच भूमिका पार पाडावी लागणार असे दिसत आहे. 

दरम्यान, पुद्दुचेरीमध्ये भाजपा आघाडीला पुन्हा कौल मिळाला आहे. भाजपा आघाडी १५ जागांवर पुढे आहे, तर काँग्रेस आघाडी ११ जागांवर पुढे आहे. 

तीन राज्ये, तिन्हीचा निकाल वेगळा

पश्चिम बंगालमध्ये डावे आणि काँग्रेस यांची ताकद कमी झाली. त्यामुळे केंद्रात सत्तेत असलेली भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातच खरी राजकीय झुंज झाली. तृणमूल काँग्रेस यावेळीही भाजपाला सत्तेपासून रोखणार का? याकडे लक्ष होते, पण भाजपाने तृणमूलचा विजयाचा वारू रोखल्याचे दिसत आहे. 

तामिळनाडूमध्ये विजय यांचा टीव्हीके पक्ष किती प्रभाव पाडू शकेल, याबद्दल सांशकता होती. पण, विजय यांच्या पक्षाला जनतेने थेट सत्तेच्या सिंहासनापर्यंत पोहोचवल्याचे दिसत आहे. टीव्हीकेचा उदय द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांच्यासाठी भविष्यात अनेक आव्हाने निर्माण करणारा असणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : 2026 Election Shocker: Power Shifts in Three States!

Web Summary : 2026 elections saw major upsets. BJP gained West Bengal. Vijay's TVK swept Tamil Nadu. Congress ousted the Left in Kerala. BJP retained Assam and Puducherry, marking significant political changes.
टॅग्स :West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६TamilnaduतामिळनाडूKerala Assembly Election 2026केरळ विधानसभा निवडणूक २०२६congressकाँग्रेसBJPभाजपाtmcठाणे महापालिका