शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
3
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
4
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
5
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
6
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
7
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
8
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
9
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
10
Suvendu Adhikari : "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले
11
पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... 
12
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
13
Vijay's TVK: अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
14
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
15
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
16
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
17
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
18
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
19
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
20
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 11:09 IST

West Bengal Election Results 2026: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी आज (०४ मे २०२६) मतमोजणीला सुरुवात झाली असून, संपूर्ण देशाचे लक्ष या निकालांकडे लागले आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी आज (०४ मे २०२६) मतमोजणीला सुरुवात झाली असून, संपूर्ण देशाचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. राज्याची सत्ता पुन्हा ममता बॅनर्जींच्या हाती जाणार की भारतीय जनता पक्ष इतिहास घडवणार, याचे चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होईल. ममता बॅनर्जी या विजयी घौडदौड सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतानाच,भाजपने यावेळी तृणमूलला जोरदार टक्कर देत सत्तापरिवर्तनाचा चंग बांधला आहे. दरम्यान, ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात बंगालमध्ये काँग्रेसचा वरचष्मा होता. १९५२ मधील पहिल्या विधानसभा निवडणुकीपासून १९७७ पर्यंत काँग्रेसने आपली पकड मजबूत ठेवली होती. मात्र, १९७७ मध्ये बंगालमध्ये मोठा राजकीय बदल झाला. ज्योति बसू यांच्या नेतृत्वाखाली सीपीआयएम सत्तेत आले. त्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य यांनी सलग ३४ वर्षे सत्ता राखण्याचा विक्रम केला, जो देशातील कोणत्याही राज्याचा प्रदीर्घ काळ राहिलेला शासनकाळ आहे. २०११ मध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने सीपीआयएम मोठा धक्का देत बंगालमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. तेव्हापासून ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांची संपूर्ण यादी:

मुख्यमंत्र्यांचे नावकालावधीपक्ष
प्रफुल्ल चंद्र घोष (पहिला कार्यकाळ)१५-०८-१९४७ – २२-०१-१९४८भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
विधान चंद्र रॉय२३-०१-१९४८ – ०१-०७-१९६२भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
प्रफुल्ल चंद्र सेन०१-०७-१९६२ – २८-०२-१९६७भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अजय मुखर्जी (पहिला सत्र)०२-०३-१९६७ – २१-११-१९६७बांगला काँग्रेस
राष्ट्रपतींचे शासन२१-११-१९६७ – २५-०२-१९६९-
अजय मुखर्जी (दुसरा कार्यकाळ)२५-०२-१९६९ – १६-०३-१९७०बांगला काँग्रेस
राष्ट्रपतींचे शासन१९-०३-१९७० – ०२-०४-१९७१-
अजय मुखर्जी (तिसरा कार्यकाळ)०२-०४-१९७१ – २८-०६-१९७१भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (विलिनीकरणानंतर)
राष्ट्रपतींचे शासन२९-०६-१९७१ – १९-०३-१९७२-
सिद्धार्थ शंकर रे२०-०३-१९७२ – ३०-०४-१९७७भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
ज्योती बसू२१-०६-१९७७ – ०६-११-२०००भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (सीपीआय-एम)
बुद्धदेव भट्टाचार्जी०६-११-२००० – १३-०५-२०११भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (सीपीआय-एम)
ममता बॅनर्जी (पहिला कार्यकाळ)२०-०५-२०११ – २६-०५-२०१६ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (एआयटीसी)
ममता बॅनर्जी (दुसरा कार्यकाळ)२७-०५-२०१६ – २०-०५-२०२१ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (एआयटीसी)
ममता बॅनर्जी (तिसरा कार्यकाळ)०३-०५-२०२१ – आजपर्यंतऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (एआयटीसी)

गेल्या काही वर्षांत भाजपने पश्चिम बंगालमध्ये आपले पाय घट्ट रोवले आहेत. मुख्य विरोधी पक्ष म्हणून समोर येत भाजपने तृणमूलसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी आपली सत्ता राखण्यात यशस्वी होऊन सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होतील? की ३४ वर्षांनंतर सीपीआयएमला हटवणाऱ्या बंगालमध्ये पुन्हा एकदा सत्तापालट होऊन भाजप नवा राजकीय इतिहास लिहिणार का? या प्रश्नांचे उत्तर आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : West Bengal: A look at the rulers before Mamata Banerjee.

Web Summary : Before Mamata Banerjee, Congress dominated West Bengal until 1977. Then, CPI(M)'s Jyoti Basu ruled for 34 years. In 2011, Banerjee's Trinamool Congress won, making her Chief Minister. The article also includes a table listing all Chief Ministers of West Bengal with their tenures and political parties.
टॅग्स :West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपा