शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
3
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
4
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
5
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
6
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
7
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
8
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
9
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
10
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
11
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
12
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
13
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
14
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
15
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
16
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
18
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
19
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
20
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 10:35 IST

Assam Assembly Election Result 2026: ईशान्य भारतातील प्रमुख राज्य असलेल्या आसाममध्ये भाजपाने विजयी हॅटट्रिक करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

ईशान्य भारतातील प्रमुख राज्य असलेल्या आसाममध्येभाजपाने विजयी हॅटट्रिक करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. येथे हिंमता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली लढत असलेल्या भाजपाने आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये राज्यातील १२६ जागांपैकी ९५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस आणि मित्रपक्षांना अवघ्या २९ जागांवर आघाडी मिळाली असून, इतरांच्या खात्यात २ जागा जाताना दिसत आहे.

आसाममध्ये २०१६ पासून सत्तेवर असलेल्या भाजपाने ही निवडणूक मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. तसेच हिमंता बिस्वा सरमा आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये टोकाचे आरोप प्रत्यारोप झाल्याने मतदार कुणाच्या बाजूने कौल देतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. दरम्यान, आज सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये सुरुवातीपासून भाजपाने आघाडी घेतल्याचं चित्र दिसत आहे.

आतापर्यंतच्या कलांमध्ये भाजपा आणि मित्र पक्षांना मिळून ९५ जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यातही राज्यात बहुमतासाठी लागणाऱ्या ६४ जागांचा आकडा भाजपाने स्वबळावर पार केला आहे.  तसेच २०२१ ला झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी भाजपा आणि मित्रपक्षांच्या जागांमध्येही लक्षणीय वाढ होताना दिसत आहे.  तर दुसरीकडे काँग्रेस आणि मित्रपक्षांची जोरदार पिछेहाट झाली असून, सध्या ते केवळ २९ जागांवर आघाडीवर आहेत. तर इतर पक्षांना केवळ २ जागांवर आघाडी मिळाली आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार आसाममधील ११९ जागांचे कल समोर आले असून, त्यात भाजपा ७३, काँग्रेस २३, बीओपीएफ ९, आसाम गण परिषद ९, एआययूडीएफ २ आणि इतर ३ जागांवर आघाडीवर आहेत. 

  

English
हिंदी सारांश
Web Title : Himanta Biswa's surge in Assam, BJP towards clear dominance.

Web Summary : BJP leads in Assam with 95 seats, aiming for a victory hat-trick under Himanta Biswa Sarma. Congress trails with 29. BJP surpasses the majority mark of 64 seats, showing significant gains compared to 2021 while the Congress faces setbacks.
टॅग्स :Assembly Election Resultsविधानसभा निवडणूक निकाल २०२६AssamआसामBJPभाजपाcongressकाँग्रेसAssam Gana Parishadअसाम गण परिषद