रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या बहुचर्चित सिनेमात अनेक कलाकारांची फौज आहे. हिंदी आणि मराठीतील बऱ्याच कलाकारांनी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन हे हिंदी तर सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी हे मराठी कलाकार दिसले. यासोबत मराठी टीव्हीवरीलही काही कलाकारांना सिनेमात झळकण्याची संधी मिळाली. स्टार प्रवाह वरील 'मुरांबा' मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी मुंढेकरचीही सिनेमात छोटी भूमिका आहे. तर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या सासूच्या म्हणजेच राणी सईबाईंच्या आईच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री कोण माहितीये का?
अभिनेत्री मृणाल साळुंखेने शिवरायांच्या सासूची भूमिका साकारली आहे. तिने इन्स्टाग्रामवर तिच्या सीनचा व्हिडीओ शेअर करत लिहिले, "सौभाग्य माझं जे मला बाळ शिवरायांच्या सासूची म्हणजेच राणी सई बाईंच्या आईची भूमिका साकारायला मिळाली.'राजा शिवाजी' चित्रपटाचा भाग बनू शकले..चित्रपटामध्ये असं पदार्पण होईल स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं."
मृणालच्या या पोस्टवर रितेश देशमुखने कमेंट केली आहे. तो लिहितो, 'सिनेमाचा अत्यंत महत्वाचा भाग होण्यासाठी धन्यवाद. आभारी आहे'. तसंच इतर मित्रपरिवारानेही कमेंट करत 'आम्हाला तुझा अभिमान वाटतो' अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
कोण आहे मृणाल साळुंखे?
मृणाल मराठी टेलिव्हिनवरील चेहरा आहे. तिने 'देवमाणूस ३'मध्ये शालिनीची भूमिका साकारली. तर कलर्स मराठीवरील 'अंबाबाई-आई तुळजाभवानी' मालिकेतही ती दिसली.
Web Summary : Mrunal Salunkhe played Shivaji Maharaj's mother-in-law in 'Raja Shivaji'. She shared her excitement on Instagram, expressing gratitude for the opportunity. Riteish Deshmukh acknowledged her contribution. Mrunal has also acted in 'Devmanus 3' and 'Ambabai-Aai Tuljabhavani'.
Web Summary : 'राजा शिवाजी' में मृणाल सालुंखे ने शिवाजी महाराज की सास की भूमिका निभाई। उन्होंने इंस्टाग्राम पर अपनी खुशी जाहिर करते हुए इस अवसर के लिए आभार व्यक्त किया। रितेश देशमुख ने उनके योगदान को स्वीकार किया। मृणाल ने 'देवमाणूस 3' और 'अंबाबाई-आई तुलजाभवानी' में भी अभिनय किया है।