शहरं
Join us  
Trending Stories
1
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसढसा रडला होता...
2
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
3
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
4
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
5
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
6
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
7
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
8
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
9
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
10
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
11
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
12
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
13
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
14
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
15
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
16
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
17
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
18
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
19
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
20
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
Daily Top 2Weekly Top 5

वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 13:40 IST

Vaishakh Angaraki Sankashti Chaturthi May 2026: २०२६ मध्ये दुसऱ्यांदा संकष्टी चतुर्थीला अंगारकी योग जुळून येत आहे. चंद्रोदय वेळ, पूजा विधी याबाबत सविस्तर जाणून घ्या...

Vaishakh Angaraki Sankashti Chaturthi May 2026: सन २०२६चा मे महिना सुरू झाला आहे. तर मराठी वर्षाचा दुसरा वैशाख मास सुरू आहे. वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जयंती साजरी केल्यानंतर आता संकष्ट चतुर्थीला अद्भूत, अतिशय शुभ मानला गेलेला अंगारक योग जुळून आलेला आहे. सन २०२६ मध्ये संकष्टी चतुर्थीला अंगारकी योग जुळून येण्याची ही दुसरी वेळ आहे. वैशाख महिन्यात अंगारक संकष्ट चतुर्थी कधी आहे? अंगारकी संकष्टी चतुर्थीला गणपती पूजन कसे करावे? राहु काल कधी आहे? जाणून घेऊया...

कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथमेश गणपती स्मरण, पूजनाने केली जाते. जे कार्य हाती घेतलेले आहे, ते निर्विघ्नपणे पार पडावे, अडथळे, संकटे, समस्या, अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वी व्हावी, यासाठी गणपतीचे आवाहन केले जाते. विघ्नहर्ता, सुखकर्ता गणपती बाप्पाची कृपा लाभावी, यासाठी विविध उपासना केल्या जातात. यामध्ये चतुर्थी व्रताचरण विशेष शुभ फलदायी मानले गेले आहे. मराठी वर्षाच्या वैशाख महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे.

प्रत्येक मराठी महिन्यात संकष्टीचे व्रत, पण अंगारक योग दुर्मिळ

प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे. गेली हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात अगदी निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. कोट्यवधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. अंगारक योग वारंवार जुळून येत नाही. चतुर्थीला अंगारक योग जुळून येणे ही दुर्मिळ बाब मानली जाते. त्यामुळेच या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढते असे मानले जाते. 

वैशाख महिन्यातील अंगारक योग संकष्ट चतुर्थी कधी?

मराठी वर्षाच्या वैशाख मासात मंगळवार, ०५ मे २०२६ रोजी संकष्ट चतुर्थी अंगारक योग आहे. या दिवशी पहाटे ०५ वाजून २४ मिनिटांनी वैशाख वद्य चतुर्थी म्हणजेच संकष्ट चतुर्थी सुरू होत असून, ०६ मे २०२६ रोजी सकाळी ०७ वाजून ५१ मिनिटांपर्यंत संकष्ट चतुर्थी असणार आहे. याचाच अर्थ ही अंगारकी संकष्टी चतुर्थी अहोरात्र असणार आहे. या दिवशी दुपारी ०३ वाजेपासून ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत राहु काल आहे.

चतुर्थीला अंगारक योगाचे महत्त्व 

मंगळवारी चतुर्थी आली की, अंगारक योग जुळून येतो. मुद्गल पुराणात तसेच गणेश पुराणात याचे संदर्भ आढळून येतात. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लालभडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेशमंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की, 'माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल! अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरदविनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते.

अंगारक संकष्ट चतुर्थीला गणेश पूजन कसे करावे?

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणपती बाप्पाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे.

अंगारक संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय झाला की काय कराल?

रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. संकष्टीच्या दिवशी गणेशाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी, असे सांगितले जाते. अगदी काहीच शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते. 

अंगारक संकष्ट चतुर्थी मे २०२६ विविध शहरांतील चंद्रोदय वेळ 

शहरांची नावेचंद्रोदयाची वेळ
मुंबईरात्रौ १० वाजून १९ मिनिटे
ठाणेरात्रौ १० वाजून १९ मिनिटे
पुणेरात्रौ १० वाजून १४ मिनिटे
रत्नागिरीरात्रौ १० वाजून १२ मिनिटे
कोल्हापूररात्रौ १० वाजून ०८ मिनिटे
सातारारात्रौ १० वाजून ११ मिनिटे
नाशिकरात्रौ १० वाजून १८ मिनिटे
अहिल्यानगररात्रौ १० वाजून १२ मिनिटे
धुळेरात्रौ १० वाजून १६ मिनिटे
जळगावरात्रौ १० वाजून १३ मिनिटे
वर्धारात्रौ १० वाजून ०० मिनिटे
यवतमाळरात्रौ १० वाजून ०१ मिनिटे
बीडरात्रौ १० वाजून ०७ मिनिटे
सांगलीरात्रौ १० वाजून ०७ मिनिटे
सावंतवाडीरात्रौ १० वाजून ०८ मिनिटे
सोलापूररात्रौ १० वाजून ०३ मिनिटे
नागपूररात्रौ ०९ वाजून ५९ मिनिटे
अमरावतीरात्रौ १० वाजून ०४ मिनिटे
अकोलारात्रौ १० वाजून ०६ मिनिटे
छत्रपती संभाजीनगररात्रौ १० वाजून ११ मिनिटे
भुसावळरात्रौ १० वाजता १२ मिनिटे
परभणीरात्रौ १० वाजून ०४ मिनिटे
नांदेडरात्रौ १० वाजून ०१ मिनिटे
धाराशीवरात्रौ १० वाजून ०४ मिनिटे
भंडारारात्रौ ०९ वाजून ५७ मिनिटे
चंद्रपूररात्रौ ०९ वाजून ५५ मिनिटे
बुलढाणारात्रौ १० वाजून ०९ मिनिटे
मालवणरात्रौ १० वाजून ०९ मिनिटे
पणजीरात्रौ १० वाजून ०७ मिनिटे
बेळगावरात्रौ १० वाजून ०५ मिनिटे
इंदौररात्रौ १० वाजून १६ मिनिटे
ग्वाल्हेररात्रौ १० वाजून १६ मिनिटे

॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥

 

English
हिंदी सारांश
Web Title : Vaishakh Angaraki Sankashti Chaturthi 2026: Auspicious time, rituals, and moonrise details.

Web Summary : In May 2026, Vaishakh Angaraki Sankashti Chaturthi brings a rare, auspicious alignment. Observe a day-long fast, perform Ganesh puja with devotion, offer jaswand flowers and durva, and break the fast after moonrise. Auspicious timings and city-specific moonrise times are provided.
टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीganpatiगणपती 2025Puja Vidhiपूजा विधीGanpati Festivalगणपती उत्सव २०२५spiritualअध्यात्मिकIndian Festivalsभारतीय उत्सव-सणAdhyatmikआध्यात्मिक