Join us
Daily Top 2Weekly Top 5

'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 14:55 IST

Open in App
1 / 9

यंदाच्या IPL हंगामात परदेशी खेळाडूंसोबतच भारतीय खेळाडूही त्यांच्या गर्लफ्रेंड्ससोबत सामन्यांसाठी प्रवास करताना दिसत आहेत. गेल्या वर्षी BCCIने या संदर्भात परदेश दौऱ्यांसाठी कडक नियम लागू केले होते.

2 / 9

२०२४-२५च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मंडळाने परदेश दौऱ्यांदरम्यान पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांना दौऱ्यावर सोबत जाण्याबाबत काही नियम तयार केले होते. आयपीएलसाठी मात्र असे कोणतेही नियम नाहीत.

3 / 9

पण आता आयपीएलमध्ये खेळाडूंसाठी अशीच नियमावली बनवली जाण्याची शक्यता आहे. 'दैनिक जागरण'च्या वृत्तानुसार, एका अहवालात म्हटले आहे की बीसीसीआय पुढील बैठकीत यावर चर्चा करणार आहे.

4 / 9

IPL मध्ये खेळाडूंच्या प्रवासाची व्यवस्था करण्याची जबाबदारी संघ मालकांची असते. त्यामुळे BCCIने या संदर्भात कोणतेही आदेश किंवा नियम जारी केलेले नाहीत. पण हे 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCI ला अमान्य आहे.

5 / 9

भारतीय क्रिकेटपटू आयपीएल सामन्यांदरम्यान त्यांच्या गर्लफ्रेंड्ससोबत प्रवास करतात आणि अनेकदा हॉटेल्समध्ये एकत्र राहतात. बीसीसीआय लवकरच या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी करू शकते.

6 / 9

भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणे टाळण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो असे सध्यातरी सांगण्यात येत आहे. काही क्रिकेटपटूंच्या गर्लफ्रेंड्स बेटिंग ॲप्ससाठी काम करतात, असे अहवाल सांगतात.

7 / 9

BCCI साठी सध्या चिंता वाढली आहे. पुढील आयपीएल हंगामापूर्वी, खेळाडूंची राहण्याची व्यवस्था, दोन सामन्यांमधला प्रवास आणि त्यांच्या गर्लफ्रेंड्ससोबतच्या प्रवासासंदर्भात काही नियम तयार केले जाऊ शकतात.

8 / 9

BCCIने नियम करण्याचा विचार केल्याने चार भारतीय खेळाडूंबाबत चर्चा रंगली आहे. कारण हार्दिक पांड्या-माहिका शर्मा आणि अर्शदीप सिंग-समरीन कौरसोबत हे टीम बसमध्ये एकत्र प्रवास करताना दिसले आहेत.

9 / 9

याशिवाय राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि त्याची गर्लफ्रेंड मॅडी हॅमिल्टन हेदेखील एकत्र दिसले आहेत. तर इशान किशन देखील त्याची गर्लफ्रेंड अदिती हुंडियासोबत प्रवास करताना दिसला होता.

टॅग्स :आयपीएल २०२६बीसीसीआयइशान किशनहार्दिक पांड्याअर्शदीप सिंगयशस्वी जैस्वालभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट